Hyundai ने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षित अपडेटेड Verna सादर केली. कंपनीने आपली नवीन जनरेशन Hyundai Verna (2023 Hyundai Verna) लाँच केली आहे. Verna पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेत २००६ मध्ये सादर करण्यात आली होती आणि आता त्याचे नेक्स्ट जरेशन मॉडेल लाँच करण्यात आले आहे. नवीन Hyundai Verna ही मध्यम आकाराची सेडान आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी ह्युंदाईची नवीन कार ठळक डिझाइनसह सादर करण्यात आली आहे. ही सेडान तुम्हाला बरेच लक्झरी फीचर्स देते . मात्र तरीही त्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. यामध्ये पाच असे फीचर्स आहेत जे मिसिंग आहेत. आज हे पाच कोणते फीचर्स आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
360 डिग्री कॅमेरा
2023 Hyundai Verna या कारमध्ये ३६० डिग्री कॅमेऱ्याचे फिचर मिळत नाही. नवीन वेरनामध्ये लेव्हल 2 ADAS सह अनेक हायटेक फीचर्स उपलब्ध आहेत. मात्र यामध्ये ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा या फीचरची कमतरता आहे. हे फिचर सध्या अनेक वाहनांमध्ये उपलब्ध आहे.
वायरलेस कनेक्टिव्हिटी असलेली मोठी स्क्रीन
ह्युंदाई वेरनाच्या आधीच्या मॉडेलमध्ये असणारी ८.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस कनेक्टिव्हिटी पर्यायांना सपोर्ट करते. मात्र त्याच्या हाय टेक व्हेरिएंटमध्ये १०.२५ इंचाचा डिस्प्ले वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्लेला सपोर्ट करत नाही. कंपनीच्यामते वापकर्त्यांसाठी एक OTA अपडेट लॉन्च केले जाणार आहे. ज्यामध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटी सुविधा देखील देण्यात येणार आहे.
फॉग लाइट्स आणि रेन -सेन्सिंग वायपर
नवीनच लॉन्च झालेल्या वेरनामध्ये स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे. त्याच्यासह त्यामध्ये दिवसा चालणारे LEDs मिळतात जे संपूर्ण बोनेटमध्ये पसरलेले आहेत. मात्र यामध्ये फॉगलॅम्प देण्यात आलेले नाहीत. तसेच यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक रेन -सेन्सिंग वायपर देण्यात आलेले नाहीत.
डिझेल आणि हायब्रीड पॉवरट्रेन
या वेरनाच्या नवीन मॉडेलमध्ये डिझेल इंजिन देण्यात आलेले नाही आहे. यापूर्वी डिझेल इंजिनसह येणारी ही त्याच्या सेगमेंटमधील एकमेव कार होती. तर याच सेगमेंटमधील होंडा सिटीमध्ये हायब्रीड सिस्टीम उपलब्ध आहे. आता सर्वात स्वस्त डिझेल सेडान खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मर्सिडीज-बेंझ ए 200d साठी 46 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.
8-वे पॉवर ड्रायव्हर सीट
नवीन ह्युंदाई वेरनामध्ये पॉवर्ड ड्रायव्हरची सीट मिळते, मात्र यामध्ये ८-वे अॅडजस्टबिलिटी नाही. इलेक्ट्रॉनिक अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटसह येणारी ही एकमेव सेडान आहे.
2023 Hyundai Verna: प्रकार आणि किमती
नवीन Hyundai Verna ज्यामध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे नियमित इंजिनसह मॅन्युअल गिअरबॉक्स आणि स्वयंचलित गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. त्याचवेळी, टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज नवीनतम Hyundai Verna मॅन्युअल गिअरबॉक्स आणि DCT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. इंजिन आणि गिअरबॉक्सच्या आधारावर वेगवेगळ्या व्हेरियंटच्या किमतीही भिन्न असतात.
2023 Hyundai Verna १०,८९,९०० रुपयांच्या प्रारंभिक किमतीत लाँच केली आहे. त्याच्या टॉप-स्पेक SX (O) 7DCT प्रकाराची किंमत १७.३८ लाख (एक्स-शोरूम) आहे. नवीन कारचे बुकिंग सुरू झाले आहे. नवीन Hyundai Verna कार बुक करण्यासाठी खरेदीदारांना २५,००० रुपयांचे टोकन घ्यावे लागेल.