भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना कंटाळून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. अशा परिस्थितीत, OLA ने इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बाजारपेठेत स्वतःसाठी एक स्थान तयार केले आहे. जर आपण एप्रिलच्या विक्रीवर नजर टाकली तर ओलाने सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. तर टीव्हीएस, बजाज आणि हिरो सारख्या कंपन्या मागे राहिल्या आहेत.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जर आपण एप्रिलमधील दुचाकींच्या विक्रीवर नजर टाकली तर एप्रिल २०२२ च्या तुलनेत एप्रिल २०२३ मध्ये त्यात २४.८० टक्के वाढ झाली आहे. यंदा दुचाकींची संख्या ६६४६६ होती. जे एका वर्षापूर्वी ५३२५६ युनिट होते.
(हे ही वाचा : ऑफर्सचा पाऊस! १५ ते १८ हजारांमध्ये खरेदी करा TVS मोटर्सची Sport बाईक, कुठे मिळतेय शानदार डील? )
विक्रीत ७२ टक्के वाढ
जर आपण OLA च्या विक्रीवर नजर टाकली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ७२.१९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या २१८८२ युनिट्सची विक्री केली आहे. जे एप्रिल २०२२ मध्ये फक्त १२७०८ युनिट होते. दुसरीकडे, जर आपण TVS आणि Ampere च्या विक्रीवर नजर टाकली तर दोन्ही कंपन्या दुसऱ्या स्थानासाठी संघर्ष करताना दिसल्या. TVS ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ८,७२६ युनिट्सची विक्री केली. आणि अँपिअरने ८,३१८ युनिट्सची विक्री केली.
एथरला बसला धक्का
इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दीर्घकाळ चांगले स्थान राखल्यानंतर एथरला मोठा धक्का बसला आहे. एप्रिलच्या विक्रीत एथर चौथ्या क्रमांकावर आहे. कंपनीने एप्रिलमध्ये केवळ ७,७४६ युनिट्सची विक्री केली, जी एका वर्षापूर्वी विकल्या गेलेल्या २,४५१ युनिट्सच्या तुलनेत २१६.०३ टक्क्यांची वाढ होती परंतु अपेक्षेपेक्षा कमी झाली.