पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे लोकं अन्य पर्यायांच्या शोधत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करताय, पण अजुन गाडीत सीएनजी किट बसवलेला नाहीये. अशातच कारमध्ये सीएनजी किट बसवताना ज्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या, अन्यथा सीएनजी किटचा फायदा होण्याऐवजी तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
– तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवण्यापूर्वी तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करेल की नाही हे नीट तपासावे. तसेच जर तुम्ही न तपासता कारमध्ये सीएनजी किट लावले आणि कार त्याला सपोर्ट करत नसेल तर अशा परिस्थितीत तुमच्या कारमध्ये अनेक समस्या येऊ शकतात ज्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
– बरेचदा लोकं काही पैसे वाचवण्याच्याकरिता अनधिकृत सेंटर्स आणि दुकानांमधून गाडीत सीएनजी किट बसवून घेतात जे गाडी आणि त्यातील प्रवाशांसाठी धोकादायक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवायचे असेल, तर कंपनीकडून किंवा अधिकृत सीएनजी किट केंद्रातूनच किट बसवून घ्या.
– कारमध्ये सीएनजी किट बसवताना हे देखील लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या कारमध्ये मिळणारे किट चांगल्या दर्जाचे आहे की नाही. कारण कमी किमतीत कमी दर्जाचे सीएनजी किट मायलेज तर कमी करेलच शिवाय कारचे इंजिनही खराब करेल, त्यामुळे सीएनजी किट बसवण्यापूर्वी त्याची गुणवत्ता, त्याची सुरक्षा वैशिष्ट्ये, त्याची हमी याचीही पूर्ण काळजी घेतली पाहिजे.
– जर तुम्ही तुमच्या कारमध्ये कंपनीऐवजी बाहेरून सीएनजी किट लावत असाल, तर असे केल्याने कंपनीकडून कारच्या इंजिनवरील वॉरंटी संपते. त्यामुळे कंपनीतच तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा प्रयत्न करा किंवा कंपनीकडून मिळालेल्या कारच्या इंजिनवर दिलेली वॉरंटी संपल्यानंतरच सीएनजी किट बसवा.
– तुम्ही तुमच्या कारमध्ये सीएनजी किट लावत असाल तर लक्षात ठेवा की सीएनजी खूप लवकर पेट धरतो. अपघात झाल्यास किंवा सीएनजी किट नीट न लावल्यास गाडीतून सीएनजी गळती होऊन लगेच आग लागते. त्यामुळे सीएनजी वाहन फक्त मायलेजच्या वेगाने चालवा जेणेकरून अपघाताचा धोका ही टाळतो. तसेच गाडीत बसवलेल्या सीएनजी किटचे फिटिंग वेळेवर तपासत रहा.