मान्सून जसजसा दाखल होतो तसतशी अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण होते. मोठ्या शहरांमध्ये पुर आल्यासारखे पाणी रस्त्यांवर साचते. काही दिवसांपूर्वी पुण्यात पाऊस पडल्यानंतर एक महिलेची कार साचलेल्या पाण्यात अडकली होती. पाणी साचलेल्या भागात एका महिलेच्या कारमधून बाहेर पडण्यासाठी धडपडतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर झाला होता. तुमच्याबरोबर असे काही घडले तर काय करावे हे तुम्हाला माहित आहे का? विशेषत: ज्या अपार्टमेंटमध्ये तळघर पार्किंगचे नियोजन योग्यरित्या केले जात नाही अशा लोकांना पुरजन्य स्थितीमध्ये कार अडकल्यास काय करावे हे माहित असणे आवश्यक आहे.

तुमची कार पुरस्थितीमध्ये अडकल्यास काय करावे हे जाणून घ्या

कारचे दार उघडू नका किंवा कार सुरु करू नका

सहसा, लोकांची पहिली प्रतिक्रिया असते की कारच्या आतील भागाची तपासणी करणे किंवा पाणी कमी होताच कार सुरू करण्याचा प्रयत्न करणे. हे करू नका! कार अनलॉक केल्याने इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होऊ शकते, ज्यामुळे बरेच नुकसान होऊ शकते. तुम्ही कारचे दरवाजे मॅन्युअली उघडू शकत असल्यास, कारचे इंजिन सुरू करू नका. त्याऐवजी, तुमची कार सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा आणि ती पुन्हा चालवण्यापूर्वी मेकॅनिककडून तपासा. एअर फिल्टर बॉक्समध्ये किंवा इतर घटकांमध्ये आणि आसपास पाणी असल्यास, ते इंजिन खराब करू शकते किंवा पुन्हा शॉर्ट सर्किट होऊ शकते, ज्यामुळे अधिक नुकसान होऊ शकते.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

मेकॅनिकला कॉल करा

पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मदतीसाठी मेकॅनिकला कॉल करा. नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकृत सेवा केंद्र किंवा प्रशिक्षित मेकॅनिकला कॉल करा. तुमच्या इन्श्युरन्स प्रोव्हाईडला देखील कळवा जेणेकरून ते तुमची मदत कशी करू शकतात हे सांगू शकतील. तुम्ही दुसरे काहीही करू शकत नाही परंतु प्रशिक्षित व्यावसायिकाकडून कारची पूर्ण तपासणी करून घेण्यासाठी कार त्यांच्याकडे सुपूर्द करा.

हेही वाचा – पावसाळ्यात कारची चमक आणि रंगाची घ्या विशेष काळजी; फॉलो करा ‘या’ टिप्स

सर्व इंधन बदलले आहे का तपासा

एकदा कारची नीट तपासणी केल्यावर, सेवा केंद्राने सर्व फ्लुइड्स (इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक फ्लुइड, क्लच फ्लुइड इ.) काढून टाकले जाते आणि ताजे भरले असते. जर हे केले गेले नसेल तर सर्विस सेंटरकडून हे काम करून घ्या. जरी त्यांनी सांगितले की हे सर्व करण्याची काही गरज नसल्याचे तरीही ते सर्व इंधन बदलण्याचा आग्रह धरा. ब्रेक आणि क्लच फ्लुइड्स यांसारखे काही फ्लुइड्स पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे ब्रेक निकामी होऊ शकतो म्हणून हा एक अतिरिक्त खर्च असेल परंतु तो योग्य आहे. फक्त सर्व फ्लुइड्स बदला.

आतील भाग स्वच्छ करा

कारच्या आतील भाग सैल वायरिंग, पाण्याचे गळती, साचलेले पाणी आणि इतर गोष्टी तपासा आणि ते पूर्णपणे स्वच्छ करा. हे करण्यासाठी एखाद्या व्यावसायिकाची मदतीची आवश्यकता असेल आणि बहुतेक आधुनिक कारमध्ये सीट अॅडजेस्टमेंट आणि आरशांसह अनेक गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स असतात. अपहोल्स्ट्री (upholstery)मधून हवा बाहेर काढा आणि साचे (moulds) तपासा आणि जर तुम्हाला काही दिसले तर कारची दुरुस्ती करून घ्या.

हेही वाचा – देशातील सर्वात लहान अन् स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली महाग; एकदा चार्ज केल्यानंतर धावणार २३० किमी, आता किती पैसे मोजावे लागणार?

आता कारचे मूल्यांकन करा

बहुतेक कार मालकांना असे वाटते की जेव्हा एखादी कार पूर परिस्थिमध्ये अडकते तेव्हा तो जीवनाचा शेवट आहे. जर वरील गोष्टींचे काळजीपूर्वक पालन केले असेल, तर तुमची कार सुरक्षित आहे, पण, जर कार काही कारणास्तव सुरू झाली असेल किंवा इंजिन ऑइल बदलले नसेल आणि इंजिन ऑइलमध्ये पाणी आढळले असेल तर तुम्ही कार विकण्याचा विचार करू शकता. आता निर्णय तुमच्यावर सोडला आहे.