प्रत्येक कारमधील लहान -मोठे सर्व पार्ट्स महत्वाचे असतात. परंतु काहीवेळा नकळत काही पार्ट्सचे नुकसान होते, ज्यामुळे वापरकर्त्यांचा खर्च वाढतो. यात कारच्या काचेवर असणारा वायपर हा देखील असा एक पार्ट आहे त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. पण काही लोक काळजी घ्यायचं सोडाच पण वायपर ब्लेड काळजीपूर्वक वापरतही नाहीत. वायपर ब्लेडचा वापर पावसाळ्यात होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला कारच्या वायपर ब्लेडची काळजी कशी घ्यायची याचे सोप्पे उपाय सांगणार आहोत. जाणून घेऊयात उपाय…
कार नेहमी सावलीत पार्क करा.
कार उन्हात उभे करणे टाळले पाहिजे, कारण वायपर ब्लेडचे रबर उन्हात खूप कडक होतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही वायपर ब्लेड वापरता तेव्हा कारच्या विंडशील्डवर स्क्रॅच येतात. म्हणून कार नेहमी सावलीत पार्क करा.
योग्य ब्लेड निवडा
बहुतेकदा खराब वायपर ब्लेड दुरुस्त करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या कारच्या मॉडेलचे ब्लेड नसले तर गॅरेज मालक कोणत्याही दुसऱ्या कारचे किंवा कंपनीचे ब्लेड लावून देतो. अशावेळी वायपर ब्लेड योग्य काम करेनासे होतात किंवा त्यामुळे कारच्या काचेचे नुकसान होते. त्यामुळे योग्य कंपनीचे वायपर ब्लेड कारमध्ये बसवले पाहिजेत.
वायपरसोबत वॉटर स्प्रेचा वापर करा
अनेकदा विंड स्क्रीनवरील धूळ , माती साफ करण्यासाठी काही जण वॉटर स्प्रेशिवाय वायपरचा वापर करतात. पण असे करणे टाळा, कारण वायपर ब्लेडचा रबर यामुळे लवकर खराब होतो. यामुळे विंडस्क्रीन नीट साफ तर होत नाहीच पण कारच्या काचेवर स्क्रॅच येतात.
मऊ कपड्याचा वापर करा.
खूप धूळ असलेल्या ठिकाणी कारची विंडशील्ड जास्त खराब होते. अशावेळी विंडशील्ड साफ करण्यासाठी वारंवार वायपरचा वापर करण्यापेक्षा मऊ कपड्याचा वापर करा. यामुळे कारची विंडशील्ड तर चकाचक होईलचं आणि वायपरचेही नुकसान होणार नाही.
गरजेचं असेल तरच वायपर वापरा
वायपरचा वारंवार वापर करून नका, जेव्हा खूप जास्त गरज असेल तेव्हाच वापर करा, यामुळे वायपरचा वापरही जास्त होणार नाही आणि तो जास्त दिवस टिकेल.