वर्षाच्या सुरुवातीला करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली होती. ऑटो क्षेत्रावर करोनाची काळी पडछाया पडली होती. मात्र यातून सावरत ऑटो क्षेत्रानं पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही वाढली आहे. गेल्या काही महिन्यात गाड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे गाडी मिळण्याचा प्रतिक्षा अवधीही वाढला आहे. असं असलं तरी २०२१ या वर्षात लोकांनी मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली. टॉप पाचमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या आहेत. जाणून घेऊयात
मारुती सुझुकी वेगनआर- या वर्षात मारुती सुझुकीची वेगनआर गाडीची सर्वाधिक विक्री झाली. या गाडीची एक्स शोरुम किंमत ४.९३ लाख आहे. कारमध्ये ११९७ सीसी इंजिन आहे. ही गाडी पेट्रोलवर २१.७९ किमीचा मायलेज देते. कंपनीने या वर्षात म्हणजेच जानेवारी २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत १.७४ लाख युनिट्स विकले.
मारुती सुझुकी आल्टो- मारुती सुझुकीच्या आल्टो गाडीला सर्वाधिक मागणी आहे. वॅगनआर नंतर सर्वाधिक मागणी आल्टोला गाडीला आहे. एक फॅमिली कार आणि खिशाला परवडणारी कार म्हणून या गाडीकडे पाहिलं जातं. कंपनीने नोव्हेंबरपर्यंत १.६२ लाख गाड्या विकल्या आहेत. ही गाडी सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ३.१५ लाख आहे.
मारुती सुझुकी बलेनो- या वर्षात सर्वाधिक विक्री झालेली तिसरी कार आहे. बलेनोची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कारचे इंजिन ११९७ सीसी आहे, जे ८८.५ बीएचपी कमाल पॉवर जनरेट करू शकते. कंपनीने एकूण १.५५ लाख युनिट्सची विक्री केली आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट– मारुती सुझुकी स्विफ्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्विफ्टची सुरुवातीची किंमत ५.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात ११९७ सीसीचे इंजिन आहे. कंपनीने मारुती सुझुकी स्विफ्टच्या एकूण १.५१ लाख युनिट्सची विक्री केली आहे.
मारुती सुझुकी इको- मारुती सुझुकी पाचव्या क्रमांकावर आहे. ही ७ सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने त्याचे सुमारे १ लाख युनिट्स विकले आहेत. इकोची सुरुवातीची किंमत ४.३८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.