Best SUV Cars in India 2022: भारतात SUV कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. त्या लोकांमध्येही प्रचंड लोकप्रिय होत आहेत. यामुळे एसयूव्हीच्या विक्रीतही मोठी वाढ बघायला मिळत आहे. देशात SUV कारना प्रचंड मागणी आहे, त्यामुळे या सेगमेंटमध्ये जास्तीत जास्त मॉडेल्स लाँच केले जातात. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एसयुव्ही (SUV) सेगमेंटच्या कारमध्ये यावर्षी चांगली वाढ झाली आहे. अधिकाधिक लोकांनी यंदा SUV कारना पसंती दिली आहे. या सरत्या वर्षात मोठ्या प्रमाणात लोकांनी SUV कारची खरेदी केली आहे. चला तर जाणून घेऊया २०२२ मध्ये कोणत्या SUV कारना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२२ मध्ये ‘या’ SUV ना मोठी मागणी

Mahindra Scorpio-N
एसयुव्ही कार निर्मितीमध्ये महिंद्राचा हातखंडा आहे. नवीन एसयूव्ही ६ आणि ७ सीटर पर्यायांसह उपलब्ध आहे. स्कॉर्पिओ एनची एक्सशोरूम किंमत बेस व्हेरियंटसाठी ११.९९ लाख रुपयांपर्यंत असून टॉप व्हेरिएंटसाठी १९.४९ लाख मोजावे लागते. आतापर्यंत या एसयुव्हीला एक लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहे.

(हे ही वाचा : Flashback 2022: २०२२ मध्ये ‘या’ टॉप ५ MPV खरेदीसाठी तुटून पडले भारतीय; पाहा यादी! )

Toyota Hyryder
टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Toyota HyRyder नुकतीच लाँच केली आहे. कंपनीने मारुती सुझुकीसोबत मिळून या कारची निर्मिती केली आहे. ही एक हायब्रिड एसयुव्ही असून या कारच्या माध्यमातून तब्बल ४० टक्के पेट्रोलचा कमी वापर होत असल्याचा दावा केला जात आहे. अर्बन क्रूझर हाय रायडरची किंमत १५.११ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि टॉप मॉडेलची किंमत १८.९९ लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Grand Vitara
मारुती सुझुकी कंपनीची मिड साईज एसयूव्ही मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही कंपनीची पॅनोरमिक सनरूफसह येणारी कार आहे. यात हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसारखे फीचर्स देखील मिळतात. या कारमध्ये एम्बिएंट लायटिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री, रिअर एसी व्हेंट्स, इंजिन सुरू आणि बंद करण्यासाठी पुश बटण, यूएसबी पोर्टसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

Kia Seltos
सर्वाधिक विकली जाणारी मिड-साइज एसयूव्ही म्हणजे किआ सेल्टोस. सेल्टोस ही ह्युंदाई क्रेटा प्रमाणेच आहे. महत्वाचे म्हणजे, या दोन्ही कार एक समान इंजिन आणि गियरबॉक्स पर्यांयांसह येतात. यंदा या एसयूव्हीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback 2022 mahindra scorpio n along with toyota hyryder are the best selling suv cars in the country see the full list pdb