Electric Scooters: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि भविष्याचा विचार करता ऑटो कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. या सरत्या वर्षात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या बाजारात लाँच झाल्या आहेत आणि लोकांनीही त्यांना चांगली पसंती दिली आहे. काही इलेक्ट्रिक गाड्या अशाही आहेत, ज्या घेण्यासाठी लोकांनी बाजारपेठेत रांगा लावल्या आहेत. आज आपण २०२२ मध्ये सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात ‘या’ इलेक्ट्रिक कारची सर्वाधिक विक्री

TATA TIAGO EV
Tiago EV १९.२kWh आणि २४kWh च्या दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या बॅटरी पॅकसह जोडलेली इलेक्ट्रिक मोटर अनुक्रमे ६१ PS पॉवर आणि ११० Nm टॉर्क आणि ७५ PS पॉवर आणि ११४ Nm टॉर्क जनरेट करते. लहान बॅटरी २५० किमीपर्यंतची रेंज देते, तर मोठा बॅटरी पॅक ३१५ किमीची रेंज देतो. Tiago EV चार चार्जिंग पर्यायांना सपोर्ट करते. ज्यामध्ये १५A सॉकेट चार्जर, ३.३kW AC चार्जर, ७.२kW AC चार्जर आणि DC फास्ट चार्जर यांचा समावेश आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ८.४९ लाख रुपये आहे.

(आणखी वाचा : Flashback 2022: सिंगल चार्जवर जबरदस्त रेंज देणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची मोठी डिमांड )

Tata Tigor EV
या इलेक्ट्रिक सेडानमध्ये Nexon EV प्रमाणेच Ziptron EV तंत्रज्ञान मिळते. Tigor EV मध्ये २६ kWh बॅटरी पॅक आणि ७५ PS आणि १७०Nm आउटपुट जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. स्टँडर्ड वॉल चार्जर वापरून ही कार ८.५ तासांत ०-८० टक्के चार्ज केली जाऊ शकते आणि २५kW DC फास्ट चार्जर वापरून फक्त ६० मिनिटांत. Tigor EV ३०६ किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत १२.४९ लाख रुपये आहे.

Tata Nexon EV
टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. Tata Nexon EV ही सर्वाधिक विक्री होणारी EV कार आहे. गेल्या महिन्यात, नेक्सॉन आणि टिगोरने ईव्ही सेगमेंटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ३१२ किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. कंपनी आपल्या बॅटरी आणि मोटरवर आठ वर्षांची किंवा १.६० लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देखील देत आहे.

(आणखी वाचा : Auto Expo 2023: जानेवारीमध्ये Maruti Suzuki करणार धमाका; सोबतच इलेक्ट्रिक कारही येणार)

BYD Atto 3
चीनच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी BYD ने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV BYD Atto 3 कार भारतात लॉन्च केली आहे.BYD Atto 3 मध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर २०१ bph ची पॉवर आणि ३१० Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये ६०.४८kwh चा बॅटरी पॅक उपलब्ध आहे. जी एका चार्जमध्ये ५२१ KM ची रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार फक्त ७.३ सेकंदात ० ते १००km/H चा वेग गाठू शकते. ही कार फक्त ५० मिनिटांत फास्ट चार्जरने ० ते ८० टक्के चार्ज करता येते. या कारची एक्स-शोरूम किंमत २२.५८ लाख रुपये आहे.

PMV EaS
काही दिवसांपूर्वी मुंबई येथील ईव्ही कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिकने सर्वात स्वस्त ईएएस ई इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. विशेष म्हणजे, ही २ सीटर माइक्रो इलेक्ट्रिक कार आहे. कारची लांबी २९१५ मिमी, रुंदी ११५७ मिमी आणि उंची १६०० मिमी आहे. कारमध्ये १७० मिमीचा ग्राउंड क्लिअरेन्स मिळतो. कार फुल चार्जनंतर १२० ते २०० किमी पर्यंतची रेंज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कारमधील बॅटरी ४ तासांत फुल चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या ई कारची किंमत केवळ ४.७९ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback 2022 tata tiago ev tata tigor ev tata nexon ev byd atto 3 are the best selling electric cars in the country pdb
Show comments