देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicles) दबदबा वाढत चालला आहे. त्यामुळेच सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. अनेक मोठमोठ्या ऑटोमोबाइल कंपन्यांनी हे २०२२ वर्ष चांगलेच गाजवले आहे. यंदा देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कारची विक्री झाली आहे. आज आम्ही तुम्हाला या सरत्या वर्षात २५ लाख रुपयांच्या आत विक्री झालेल्या कारची मााहिती देणार आहोत. तुमचाही इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे.
‘या’ आहेत जबरदस्त रेंज देणाऱ्या कार
Tata Tigor EV
टाटा मोटर्सने आपली Tata Tigor EV लाँच केली आहे. Tigor EV ५५ kW पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करते आणि २६-kW लिक्विड-कूल्ड, हाय एनर्जी डेन्सिटी बॅटरी पॅक देण्यात आला आहे. IP६७ रेटेड बॅटरी पॅक आणि मोटरने वेदरप्रूफ बनवते. कंपनीने भारतीय बाजारात याची प्रारंभिक किंमत १२.४९ लाख (एक्स-शोरूम) रुपये इतकी ठेवली आहे. एकदा ही कार फुल चार्ज केल्यावर ३१५ किमी (ARAI प्रमाणित) रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
(हे ही वाचा : Sporty लूक असणारी कार हवी आहे? ‘या’ आहेत देशातील १० लाखांपेक्षा कमी किमतीतील कार )
MG ZS EV facelift
MG Motor ने आपली शुद्ध इलेक्ट्रिक ZS EV चे फेसलिफ्ट व्हर्जनला भारतात लाँच केले आहे. नवीन MG ZS EV 2022 मध्ये सध्याच्या मॉडलच्या तुलनेत सर्वात जास्त रेंज देण्यासाठी मोठ्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. नवीन ZS EV २०२२ मध्ये ५०.३ kWh ची बॅटरी दिली गेली आहे. ही फुल चार्ज मध्ये ४६१ किमी पर्यंत रेंज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यात सनरूफ आणि सहा एअरबॅग सोबत १७ इंचाची नवीन डिझाइन करण्यात आलेले व्हील्स मिळते. MG ने फेसलिफ्ट ZS EV ऑल-इलेक्ट्रिक एक्साइट मॉडलेची किंमत २१.९९ लाख रुपये आहे.
Tata Nexon EV Max
Tata Nexon EV Max कंपनीने या कारमध्ये पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस एसी मोटर दिली आहे. ही मोटर ४०.५ केडब्लूएच लिथियम आयन बॅटरीसोबत जोडलेली आहे. कारमधील मोटर या बॅटरीच्या सहाय्याने १४१ bhp मॅक्सिमम पॉवर आणि २५० Nm पीक टॉर्क जनरेट करु शकते. कंपनीने या कारमध्ये मोठी पॉवरफुल बॅटरी वापरली आहे. या बॅटरीच्या जोरावर नवीन नेक्सॉन ईव्ही मॅक्स युजर्सना ARAI सर्टीफाइड ४३७ किमीपर्यंतची रेंज देते. म्हणजेच एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही इलेक्ट्रिक कार न थांबता ४३७ किलोमीटरपर्यंत धावू शकेल टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सच्या व्हेरिएंटच्या किंमती १७.७४ लाख रुपये (एक्स शोरुम) ते १९.२४ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.