Flipkart Big Billion Days Sale 2024 : भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात अनेक जण नवी कार किंवा बाईक खरेदी करतात. अशाच ग्राहकांसाठी आता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून आकर्षक डील्स आणि डिस्काउंट ऑफर्स देण्यास सुरुवात झाली आहे. वाहनांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी डिस्काउंट दिली जाणार आहे. त्यात सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टने त्यांच्या ‘फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल’च्या माध्यमातून इलेक्ट्रिक आणि पेट्रोलवरील स्कूटर आणि बाइक्सवर आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत.

फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलमध्ये Hero, Bajaj, TVS, Ola, Chetak, Jawa, Yezdi, Vida, Ather आणि इतर टॉप ब्रॅण्ड्ससह मिळून त्यांच्या वेबसाईटवरून दुचाकी खरेदीदारांची संख्या वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे तुम्हालाही घरबसल्या डिस्काउंटसह स्कूटर किंवा बाईक खरेदी करायची असेल, तर ‘फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल’मध्ये उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर्सविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

Flipkart Big Billion Days Sale Discount: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये पाहण्यासारखे काय आहे?

फ्लिपकार्टमध्ये बाइक्स आणि स्कूटरचे एक वेगळे सेक्शन आहे. त्यात ग्राहकांना पेट्रोल आणि इलेक्ट्रिक यापैकी तुमच्या पसंतीचे वाहन निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर बाइक्स, प्रीमियम स्पोर्ट्स बाइक्स आणि स्कूटरसारख्या पेट्रोल दुचाकींचा समावेश आहे. त्यात पेमेंटसाठी ग्राहक त्यांना पाहिजे तो पर्याय निवडू शकतात. त्यात जर ग्राहकांनी Axis Bank क्रेडिट कार्डवर खरेदी केली, तर त्यांना पाच टक्के कॅशबॅक मिळेल आणि Super Coin द्वारे लॉयल्टी लाभाचा समावेश आहे. तसेच एचडीएफसीसारख्या प्रमुख बँकांवरही डील्स उपलब्ध आहेत.

Flipkart Big Billion Days Sale : किती सूट मिळू शकते?

Hero Super Splendor डिस्क व्हेरिएंटची अधिकृत किंमत ८९,०७८ रुपये आहे; परंतु हीच बाईक फ्लिपकार्टवर ८४,१९८ रुपयांना उपलब्ध आहे. या सवलतीव्यतिरिक्त क्रेडिट कार्डवर १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूटदेखील मिळेल.

Flipkart Big Billion Days Sale : कोणत्या शहरांमध्ये केली जाईल डिलिव्हरी?

Flipkart च्या मते, ई-कॉमर्स वेबसाइट देशभरातील १२०० पिन कोड आणि ७०० हून अधिक शहरांमध्ये दुचाकी वाहने वितरित करते.

Flipkart Big Billion Days Sale : किती टक्के झाली विक्री?

ई-कॉमर्स कंपनीने सांगितले की, ऑगस्ट २०२४ मध्ये फ्लिपकार्टवर दुचाकींच्या विक्रीत सहा पट वाढ झाली आहे. कॉम्प्युटर, स्कूटर आणि प्रीमियम टू-व्हीलर, विशेषत: इलेक्ट्रिक सेग्मेंटमध्ये वाढ होत आहे.

Flipkart Big Billion Days Sale : ‘या’ ब्रॅण्ड्सवर मिळतेय बंपर सूट

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Hero, Bajaj, TVS, Ola, Chetak, Jawa, Yezdi, Vida, Ather आणि इतर ब्रॅण्ड्सच्या स्कूटर आणि बाइकवर हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. या सवलतीशिवाय क्रेडिट कार्डद्वारे वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ ते १० टक्के कॅशबॅक ऑफरदेखील दिली जात आहे.