Flipkart Big Billion Days | Bike under 1 lakh: फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये बाइक्सवर सवलतींचा पाऊस पडत आहे. शोरूमला भेट देण्यापासून ते एका क्लिकच्या अंतरावर दुचाकी खरेदी करण्याचा मार्ग या ई-कॉमर्स कंपनीने अगदी सोपा करून टाकलाय. फ्लिपकार्ट या बिग बिलियन डेज सेलमध्ये विविध पेमेंट स्किम्सवर ऑफर प्रदान करीत आहे. त्यात क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील EMI पर्याय, विशेष कूपन ऑफर व बास्केट सूट यांचा समावेश आहे.

एक लाख रुपयांच्या आत असलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या टॉप पाच मोटरसायकलींची यादी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया

१. हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe- Non i3S with kick start)

MRP: ६१,८७० रुपये

फ्लिपकार्ट किंमत: रु ५१.६२०

Hero HF Deluxe ची बाजारातील किंमत ६१,८७० आहे; परंतु Flipkart Big Billion Days Sale मध्ये या बाईकवर तब्बल १०,००० रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. ग्राहकाने १०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास फ्लिपकार्ट ७,५०० रुपयांपर्यंत बचत करणारी स्कीम ऑफर करत आहे. त्याशिवाय ई-कॉमर्स कंपनीकडे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर आधारित ३,२५० रुपयांपर्यंतच्या पेमेंट ऑफर्स आहेत.

हेही वाचा… टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी

२. बजाज प्लॅटिना 110 ड्रम (Bajaj Platina 110 Drum)

MRP : रु ७१,३५४

फ्लिपकार्ट किंमत : ६१,३५४ रुपये

प्लॅटिना एक खिशाला परवडणारा असा पर्याय म्हणून बजाज ऑफर करीत आहे. फ्लिपकार्ट फेस्टिवल सेलमध्ये या बाईकवर १०,००० रुपयांपर्यंतची सूट मिळते. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये ३,४६८ रुपयांपर्यंतच्या क्रेडिट कार्ड डीलसह २,००० रुपयांचे कूपन सूट म्हणून देत आहे. तसेच सात हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास ग्राहक आणखी पाच हजार रुपयांची बचत करू शकतो.

३. हिरो स्प्लेंडर (Hero Splendor+ Non i3S Drum)

MRP : ७५,४४१ रुपये

फ्लिपकार्ट किंमत : ६७,९९९ रुपये

भारतातील सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल, स्प्लेंडर प्लसला फ्लिपकार्ट विक्रीमध्ये ८,००० रुपयांपेक्षा जास्त सूट मिळते. मोटरसायकलची अधिकृत किंमत ७५,४४१ रुपये आहे; परंतु बिग बिलियन डेज सेलमध्ये स्प्लेंडर प्लसची किंमत ६७,९९९ रुपये आहे. जर ग्राहकाने सात हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला, तर तो सुमारे ५,३०७ रुपये वाचवू शकतो. तर, क्रेडिट कार्डवर तीन हजार रुपयांपर्यंत आणि डेबिट कार्डवर ३,२५० रुपयांपर्यंत सूट मिळते.

४. बजाज पल्सर 125 (Bajaj Pulsar 125)

MRP: रु. ९२,८८३

फ्लिपकार्ट किंमत : ७६,०३९ रुपये

पल्सर लाइनअपमधील ही मोटरसायकल खिशाला परवडणारी आहे. Pulsar 125 अधिकृतपणे रु. ९२,८८३ (एक्स-शोरूममध्ये) उपलब्ध आहे; परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल १२ हजार रुपयांची मोठी सूट देत आहे. अनेक डील्स आणि ऑफर्ससह Pulsar 125 ची किंमत फ्लिपकार्टवर ७६,०३९ रुपये इतकी आहे. त्यात दोन हजार रुपयांची कूपन डील आहे. ६,२५० रुपयांपर्यंत क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर डील आहे. तर, १२ हजार रुपयांच्या अधिक खर्चावर आणखी ८,८४४ रुपयांची बचत होते.

हेही वाचा… ५ लाखांपर्यंत खरेदी करा Maruti Suzukiची ‘ही’ फॅमिली कार; स्पोर्टी लूक, ड्युअल एअरबॅग्जसह मिळणार ‘हे’ दमदार फिचर्स

५. हिरो Xtreme 125R IBS (Hero Xtreme 125R IBS)

MRP : रु ९५,०००

फ्लिपकार्ट किंमत : रु. ७८,९९९

आणखी एक 125 cc जी या यादीत सामील होत आहे आणि ती म्हणजे Xtreme 125R. याची अधिकृत वेबसाइटवर किंमत ९५ हजार रुपये आहे; तर फ्लिपकार्ट सेलमध्ये याची किंमत ७८,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे. या डीलमध्ये ग्राहकाने १५ हजार रुपये खर्च केल्यास ९,८०१ रुपयांपर्यंत ऑफर मिळू शकते. तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ६,२५० रुपयांपर्यंतच्या डीलचा समावेश आहे.

Story img Loader