Flipkart Year End Sale Details : संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक गाड्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सर्वच वाहन उत्पादक कंपन्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्या लाँच करताना दिसत आहेत. आपल्या वाहनात काय वेगळेपण हे दाखवण्यात जणू काही सगळ्याच कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. तुम्हीसुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ‘द फायनान्शियल एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार दिग्गज दुचाकी कंपनी टीव्हीएस मोटर ही त्यांच्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक म्हणजे TVS iQube वर फ्लिपकार्ट इयर एण्ड सेलमध्ये (Flipkart Year End Sale) मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.
फ्लिपकार्ट ऑफर (Flipkart Year End Sale)
iQube ने टीव्हीएस मोटरला ईव्ही (EV) विभागात दुसरे स्थान मिळविण्यास मदत केली आहे. २०२४ वर्ष संपण्याआधी ही स्कूटर खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. कारण- फ्लिपकार्टवर iQube 2.2 kWh या मॉडेलची किंमत १,०७,२९९ रुपये आहे; पण, ई-कॉमर्स दिग्गज तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट २० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या उत्पादनांवर थेट १२ हजार ३०० रुपयांची सूट देणार आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डाचा उपयोग केल्यास २,५०० रुपयांपर्यंत सवलत व आठ हजार ९५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलतसुद्धा मिळू शकते. ई-कॉमर्स वेबसाइटकडून ईएमआय योजनादेखील प्रदान करण्यात येत आहे; ज्यात ग्राहकांना सहा हजार रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येईल.
हेही वाचा…2025 Honda SP 160 : होंडाची नवीन बाईक लाँच! कमी बजेटमध्ये मिळेल पावरफुल इंजिन; एकदा फीचर्स बघाच
फीचर्स
TVS iQube 2.2 kWh आवृत्ती 4 bhp आणि 33 Nm टॉर्क जनरेट करते. पूर्ण चार्ज केल्यावर ७५ किमी प्रतितास वेगाने पोहोचण्यास सक्षम, बॅटरी ८० टक्के चार्ज होण्यासाठी अंदाजे दोन तास व ४५ मिनिटे इतका वेळ लागतो. स्कूटरला ५ इंच टीएफटी डिजिटल डिस्प्ले आहे, जी दिवसा आणि रात्रीच्या दृश्यमानतेसाठी स्वयंचलितपणे ॲडजेस्ट होते. नंबर प्लेटला एलईडी लाइट, ब्रेकिंग सिस्टीममध्ये 220mm फ्रंट डिस्क आणि 130mm रीअर ड्रम असून, ग्राउंड क्लीयरन्स 157mm व सीटची उंची 770mm आहे.