Monsoons Tips: जून महिना सुरू झाला असला तरी अजूनही काही ठिकाणी हवा तसा पाऊस पडलेला नाही. पण, सध्याचे वातावरण पाहता कधी मुसळधार पाऊस सुरू होईल हे सांगता येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर मालकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. इलेक्ट्रिक बाईक विविध हवामान परिस्थितींचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली असताना, पावसाळ्यात काही अतिरिक्त सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील टिप्सचे अवश्य पालन करा.
गाडी नेहमी स्वच्छ ठेवा
पावसाळ्यात तुमची इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर नियमित स्वच्छ करा आणि कोरडी ठेवा. गाडीवर चिखल, घाण किंवा पाणी जमा होऊ शकते, ज्यामुळे गाडीला गंज लागण्याची भीती असते. हा गंज टाळण्यासाठी तुमची गाडी नेहमी स्वच्छ ठेवा. इलेक्ट्रिक कनेक्शन, ब्रेक आणि सस्पेंशन घटकांकडे लक्ष देऊन गाडी पुसण्यासाठी मऊ कापड किंवा स्पंजचा वापर करा.
वॉटरप्रूफ कव्हरने गाडी झाकून ठेवा
इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरसाठी डिझाइन केलेल्या उत्तम गुणवत्तेच्या वॉटरप्रूफ कव्हरमध्ये गाडी झाकून ठेवा. हे कव्हर्स पावसाच्या पाण्यापासून गाडीचे संरक्षण करतील. यामुळे बॅटरी आणि मोटरसारख्या भागात पाणी जात नाही. त्यामुळे गाडीसाठी चांगल्या दर्जाचे टिकाऊ कव्हर निवडा.
संरक्षक कोटिंग्ज लावा
मेण किंवा सिलिकॉनआधारित स्प्रे यांसारखे संरक्षणात्मक कोटिंग्ज लावल्याने हे कोटिंग्स पेंट केलेल्या पृष्ठभागांचे संरक्षण करतात. हे पाणी आत जाण्यापासून आणि गाडीचे नुकसान होण्यापासून वाचवतात. तुमच्या इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटरच्या फ्रेमवर आणि इतर अतिसंवेदनशील भागांवर हे कोटिंग्ज तुम्ही लावू शकता.
नियमितपणे बॅटरी तपासा
पावसाळ्यातील ओलाव्यामुळे बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी सतत बॅटरी तपासा आणि ती कोरडी राहील याची खात्री करा.
हेही वाचा: पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? ‘या’ टिप्स करा फॉलो, प्रवास होईल सुखकर
इलेक्ट्रिक कनेक्शन सुरक्षित करा
इलेक्ट्रिक कनेक्शन आर्द्रतेसाठी असुरक्षित असतात, ज्यामुळे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि नुकसान होऊ शकते. बॅटरी टर्मिनल्स, चार्जर पोर्ट आणि वायरिंग हार्नेससह सर्व इलेक्ट्रिक कनेक्शनची नियमितपणे तपासणी करा. तसेच पावसाचे पाणी त्यात जाऊ नये म्हणून डायलेक्ट्रिक ग्रीस लावा.
गाडीची सर्व्हिसिंग करा
तुमच्या इलेक्ट्रिक गाडीची नियमित सर्व्हिसिंग करा, विशेषत: पावसाळ्याच्या आधी आणि नंतर याचे सर्व्हिसिंग करून घ्या.
गाडी छप्पर असलेल्या ठिकाणी पार्क करा
पावसाळ्याच्या दिवसात गाडी पार्किंगमध्ये किंवा छप्पर असलेल्या ठिकाणी पार्क करा, जेणेकरून समस्या उद्भवणार नाही. मात्र, शक्य नसल्यास गाडीला कव्हर घाला.