Electric Car: तुम्ही जर एखादी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबईस्थित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिकने नुकतीच देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कारला ‘EaS-E’ असं नाव दिलं आहे. ही कार मायक्रो कॅटेगरीमध्ये लाँच झाली असून या कारमधून केवळ २ प्रवासी प्रवास करू शकतात. या कारची एक्स-शोरूम किंमत ४.७९ लाख रुपये ठेवण्यात आली असून ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला बुक करायची असेल तर तुम्ही ही कार फक्त २ हजार रुपयात बुकिंग करू शकता. कंपनीकडून सध्या ही इलेक्ट्रिक कार सर्वात स्वस्त असल्याचा दावा केला जात आहे. ही कार कशाप्रकारे बुक करता येईल, जाणून घेऊया सोपी पद्धत.

EaS -E इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
या कारमध्ये १० Kwh क्षमतेची लिथियम फॉस्फेट बॅटरी वापरली गेली आहे, जी सुमारे २०hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे चार तास लागतील आणि ही कार एका चार्जमध्ये १२० ते २०० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. त्याच वेळी, त्याचा टॉप स्पीड ताशी ७० किलोमीटर असेल.

Petrol Diesel Price Today On 5th November
Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी झालं स्वस्त? तुमच्या शहरांतील इंधनाचा दर इथे चेक करा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
Petrol And Diesel Rates In Marathi
Petrol Diesel Rates : महाराष्ट्रात कमी झाले का पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग
Car sales around Diwali has fallen so low this year
Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?

या कारमध्ये ११ कलर ऑप्शन्स दिले आहेत. ब्रिलियंट व्हाइट, डीप ग्रीन, फंकी यलो, मॅजेस्टिक ब्लू, पॅशनेट रेड, पेपी ऑरेंज, प्युअर ब्लॅक, रॉयल बेज, रस्टिक चारकोल, स्पार्कल सिल्व्हर, विंटेज ब्राउन अशा रंगाचा समावेश आहे. तसेच रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिमोट पार्किंग असिस्ट, ओटीए अपडेट्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारखे अनेक स्मार्ट फीचर्स या कारमध्ये उपलब्ध असतील.

( आणखी वाचा : Ola Electric Scooter Scam: २० आरोपींना अटक; देशभरात एक हजाराहून अधिक ग्राहकांची फसवणूक )

दोन हजारात बुक करा EaS -E इलेक्ट्रिक कार

तुम्हालाही इलेक्ट्रिक कार खरेदी करायचे असेल तर कंपनीने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. EaS -E इलेक्ट्रिक कार तुम्हाला फक्त २००० रुपयांमध्ये बुक करता येईल. उर्वरित रक्कम कार डिलीवरीच्या वेळी भरावी लागेल. जर तुम्ही वाहनाच्या सुरुवातीच्या १०,००० बुकिंगमध्ये सहभागी झालात तर तुम्हाला कार फक्त ४.७९ लाख रुपयांमध्ये मिळेल. पण जर तुमचे बुकिंग १० हजारांनंतरच्या संख्येत असेल तर तुम्हाला कारसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. पीएमव्हीने सांगितले की, आतापर्यंत ६ हजार कारचे बुकिंग झाले आहे. EaS-E साठी एकूण बुकिंगमध्ये भारतीय आणि परदेशी ग्राहकांचाही समावेश आहे.

EaS -E इलेक्ट्रिक कार बुक करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

  • कंपनीच्या अधिकृत वेबसाइट pmvelectric.com वर जा.
  • प्री ऑर्डर बुकिंगच्या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर एक फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये तपशील भरा.
  • नंतर प्री-बुकिंग वर क्लिक करा.
  • पेमेंट पर्याय उघडतील.
  • पैसे देऊन कार बुक करा.