Car Maintenance : आपल्या इतर वस्तुंप्रमाणे कारदेखील आपल्याला प्रिय असते. पैशांची जुळवाजुळव करून, खर्चाचं गणित सांभाळुन किंवा इएमआयचा पर्याय स्वीकारून अनेकजण त्यांचे कार घेण्याचे स्वप्न पुर्ण करतात. पण कारची नीट काळजी न घेतल्यास काही दिवसांनी कार जुनी दिसायला. यावेळी नेमके कोणते उपाय करायचे हे बऱ्याच जणांना माहित नसते. कारची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास ती नव्यासारखी राहू शकते, यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या जाणून घ्या.
कार वॅक्स वापरा
प्रत्येकवेळी कार वॉशनंतर कार वॅक्स वापरा. यामुळे कारचा रंग खराब होत नाही. यामध्ये कारच्या पेंटवर एक थर तयार केला जातो जेणेकरून धूळ, चिखल आणि इतर कोणतीही घाण यामुळे कार खराब होत नाही.
आणखी वाचा : नवीन कार घेण्याचा विचार करताय? मारुती सुझुकीच्या ‘या’ तीन गाड्यांची होतेय सर्वाधिक विक्री; जाणून घ्या फीचर्स
धुताना काळजी घ्या
कार धुताना सामान्य डिटर्जंट किंवा साबण कधीही वापरू नये. तसेच कडक ब्रश वापरू नये. यामुळे तुमच्या कारचा रंग खराब होतो आणि त्याचे डाग राहिले तर ते निघतही नाहीत. कार धुण्यासाठी नेहमी मऊ कापड आणि शाम्पू किंवा कार वॉश फोम किंवा लिक्वीड वापरा.
कडक उन्हात गाडी पार्क करू नका
कडक उन्हात गाडी पार्क करणे टाळावे. कार नेहमी सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी पार्क करा. यामुळे गाडीचा रंग लवकर खराब होणार नाही.
आणखी वाचा : ‘या’ आहेत सुझुकीच्या लोकप्रिय बाईक्स व स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स
कव्हरने झाकून ठेवा
जर तुम्ही अनेक दिवस कार वापरणार नसाल, तर तुम्ही ती कव्हरने झाकून ठेवावी. यामुळे तुमची कार घाण होणार नाही आणि पाऊस, कडक उन्हापासूनही गाडीचे संरक्षण होईल. पण पावसाळ्यात सतत कव्हर वापरणे टाळावे, कारण कव्हरमध्ये ओलावा राहिल्याने कारला गंज लागण्याची शक्यता असते.