Lionel Messi Cars Collection: १८ डिसेंबर म्हणजेच आज रविवारी फिफाचा फायनल (FIFA World cup 2022) सामना रंगणार आहे. कतारच्या Lusail Stadium वर हा सामना रंगणार आहे. यंदाचा वर्ल्डकप कोणती टीम जिंकणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. लिओनेल मेस्सी सर्वांचा आवडता खेळाडू आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, मेस्सीला गाड्यांची खूप आवड आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीप्रमाणे तुम्ही अनेक खेळाडूंना महागड्या कार आणि बाईक घेऊन फिरताना पाहिले असेल, त्यातच दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्याकडेही गाड्यांचे उत्तम कलेक्शन आहे. चला तर मग आज आपण अर्जेंटिना संघाकडून खेळणाऱ्या जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी असलेल्या लिओनेल मेस्सीच्या मस्त कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिओन मेस्सीचे ऑडी कलेक्शन

लिओन मेस्सीकडे अनेक उत्तमोत्तम कारचे कलेक्शन असले तरी आज आम्ही तुम्हाला त्याच्या काही महागड्या गाड्यांच्या कलेक्शनबद्दल सांगणार आहोत, ज्या त्याने अलीकडेच त्याच्या गॅरेजमध्ये समाविष्ट केल्या आहेत. लिओनेल मेस्सीने अलीकडेच त्याच्या कलेक्शनमध्ये ३ महागड्या कपल कार जोडल्या आहेत, ज्यात ऑडी RS6, A7 आणि Q7 यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा : उद्योगपतीचा नादच खुळा! भारतातील सर्वात महागडी सुपरकार खरेदी केली, किंमत वाचून तुम्हालाही धक्काच बसेल)

मेस्सीचे महागड्या कारचे कलेक्शन

लिओनेल मेस्सीकडे रेंज रोव्हर मॉडेल्सही आहेत, त्याच्याकडे रेंज रोव्हर वोग आणि स्पोर्ट एडिशन आहे. मर्सिडीज एसएलएस एएमजी मॉडेलचाही मॅसीच्या सर्वोत्कृष्ट कलेक्शनमध्ये समावेश आहे. याशिवाय मेस्सीकडे मासेराटी ग्रॅन टुरिस्मो एमसी स्ट्रॅडेल कार आहे, जी सर्वात महागडी कार आहे. मेस्सीकडे सर्वात महागड्या कारच्या संग्रहात आणखी एक कार आहे. ही सुपरकार 4.3L. फेरारी F136 E आहे, जे V8 इंजिनद्वारे समर्थित आहे आणि ५०३hp अश्वशक्ती निर्माण करते. लिओनेल मेस्सीच्या सर्वात मौल्यवान कारांपैकी एक म्हणजे Pagani Zonda Tricolore ज्याची किंमत १.७० दशलक्ष डॉलर्स आहे.

या’ मस्त कारचाही यादीत समावेश
मेस्सीकडे Cadillac Escalade SUV चे कलेक्शन आहे, जी जगातील सर्वात शक्तिशाली SUV पैकी एक आहे. मेस्सीच्या संग्रहात Lexus RX 450h आणि एक मिनी कूपर देखील आहे.