Force Citiline 3050WB specifications : फॅमिली पिकनिक किंवा मित्रांबरोबर एखाद्या सहलीला जायचे असल्यास पाच सीटरच्या गाडीचा काहीच उपयोग नसतो. मग अनेकांना छोट्या गाडीत एका सीटवर तीनऐवजी चार लोकांना बसवून घेऊन जावे लागते. त्यामुळे प्रत्येकाचा प्रवास अडचणींचा होऊन जातो. सध्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात चार ते पाच सीटर कार उपलब्ध आहेत. पण, जर तुमचे कुटुंब मोठे असेल, तर तुम्हाला नऊ ते १० सीटर कार घ्यावी लागेल. इंडियन ऑटो मेकर ब्रँड फोर्स मोटर्स (Force Motors) भारतात सिटीलाईन नावाने एक १० सीटर कार विकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर आज आम्ही तुम्हाला १० प्रवासी बसू शकतील अशा कारची ओळख करून देणार आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात मर्सिडीज-बेंझचे इंजिन वापरण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त, आकाराच्या बाबतीत ती टोयोटा फॉर्च्युनरपेक्षाही मोठीआहे. या कारचे नाव फोर्स सिटीलाइन 3050WB (Force Citiline 3050WB) असे आहे. फोर्स सिटीलाइनचे वैशिष्ट्य म्हणजे यात ड्रायव्हरशिवाय नऊ लोक बसू शकतात. मग या फोर्स सिटीलाईन 3050WB ची किंमत काय? तसेच या कारचे इंजिन, सीटिंग कपॅसिटी, केबिन आदी अनेक फीचर्सबद्दल जाणून घेऊ…

किंमत

गुरखा एसयूव्ही व ट्रॅक्स क्रूझरसह प्लॅटफॉर्म शेअर करताना, फोर्स सिटीलाइन 3050WB ची एक्स-शोरूम किंमत १६,२८,५२७ रुपये आहे.

इंजिन

या गाडीचे २.६ लिटर डिझेल इंजिन मर्सिडीज-बेंझवरून प्राप्त करण्यात आले आहे. पण, ते ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह फक्त 91hp व 250Nm टॉर्क जनरेट करते.

सीटिंग कॅपॅसिटी (आसन क्षमता)

फोर्स सिटीलाइन 9+D आसन क्षमता असलेली ही गाडी ड्रायव्हरसह १० सीटरची आहे. तसेच गाडीमध्ये दुसऱ्या व चौथ्या रांगेत बेंच सीट्स मिळतात आणि तिसऱ्या रांगेत कॅप्टनच्या सीट्स आहेत.

केबिन

फोर्स सिटीलाइनमध्ये अगदी बेसिक इंटेरियर्स मिळतात आणि त्यात इन्फोटेन्मेंट सिस्टीमही नाही. त्यात मागील प्रवाशांसाठी रूफ माउंटेड एअर कंडिशनिंग व्हेंट्स दिले गेले आहेत.

याव्यतिरिक्त फोर्स सिटीलाइनची लांबी ५,१२० मिमी, रुंदी १८१८ मिमी व उंची २,०२७ मिमी आहे. फोर्स सिटीलाइनच्या तुलनेत टोयोटा फॉर्च्युनर या गाडीची लांबी ४,७९६ मिमी, रुंदी १८५५ मिमी व उंची १८३५ मिमी आहे. सिटीलाइन लांबी आणि उंचीमध्ये उत्कृष्ट आहे.