10 Seater Car: भारतीय बाजारात मोठ्या कुटुंबासाठी ७, ८ सीटर कारची बंपर डिमांड आहे. या ७ सीटर कारमध्ये मारुती सुझकी अर्टिगा आणि रेनो ट्रायबर सारख्या स्वस्त एमपीव्ही सोबत टोयोटा फॉर्च्युनर सारख्या पॉवरफुल गाड्या सुद्धा आहेत. पण आज आम्ही तुम्हाला या लेखात भारतीय बाजारपेठेमध्ये असणाऱ्या एका भन्नाट १० सीटर कार्सबद्दल माहिती देणार आहोत. जी अनेक लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या कारमध्ये दमदार मायलेजसह उत्तम लूक आणि भन्नाट फीचर्स देखील मिळतात. चला तर पाहूया कोणती आहे ही कार…
सर्वात भारी १० सीटर कार
फोर्स मोटर्सने भारतीय बाजारात ‘Force Citiline’ ही कार सादर केली आहे. या कारमध्ये एकावेळी दहा लोकं आरामात प्रवास करू शकतात. मोठ्या कुटुंबासाठी ही कार अतिशय फायदेशीर ठरेल. यात समोरच्या आसनांसह (२+३+२+३) आसन मांडणी मिळते.
इंजिन
Force Citiline आकाराने खूप मोठी आहे. त्याची लांबी ५१२० मिमी, रुंदी १८१८ मिमी, उंची २०२७ मिमी, व्हीलबेस ३०५० मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स १९१ मिमी आहे. यात २.६ लीटर डिझेल इंजिन आहे. हे इंजिन ९१ अश्वशक्ती आणि २५० Nm आउटपुट देते. हे ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. कारचे वजन ३१४० किलो आहे. यात ६३.५ लीटरची इंधन टाकी आहे.
(हे ही वाचा : नव्या बाईक अन् स्कूटरचे हेडलाइट्स दिवसाही का सुरूच असतात? जाणून घ्या यामागील ‘हे’ खरं कारण )
फीचर्स
सिटीलाइनमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशनसारखे फीचर्स आहेत. सिंगल व्हेरिएंटमध्ये मिळणारी ही एमपीव्ही मोठे कुटुंब आणि व्यावसायिक वापरासाठी चांगली आहे. यात कंपनीने नवीन फ्रंट ग्रिल आणि बॉडी कलर्ड पॅनल्स दिले आहेत.
Force Citiline चे कॅबिन अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. यात आकर्षक डॅशबोर्ड, डिजिटल इंस्ट्रमेंट क्लस्टर, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, बॉटेल होल्डरसारखे फीचर्स मिळतात. या एमपीव्हीमध्ये ६३.५ लिटरचा फ्यूल टँक मिळतो. कंपनीने या गाडीवर ३ वर्षे किंवा ३ लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी दिली आहे.
किंमत
Force Citiline या १० सीटर कारची सुरुवातीची किंमत रु. १५.९३ लाख (एक्स-शोरूम) आहे.