13 Seater Car: तुमचं कुटुंब खूप मोठं असेल आणि तुम्ही तुमच्या मोठ्या कुटुंबासह बाहेर फिरायला जायच प्लॅन आखत असाल तर तुम्हाला मोठ्या वाहनाची गरज भासेल आणि जर सात किंवा आठ सीटर एमपीव्ही देखील तुमची गरज पूर्ण करू शकत नसेल तर वेगळ्या पर्यायाचा विचार करावा लागेल. आता यासाठी एक मोठे वाहन आले आहे.
आता तुमच्यासाठी खास १३ सीटर क्रूझर कार आली आहे. होय! हे खरं आहे. आज आम्ही अशाच एका वाहनाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये १३ लोक एकत्र बसून आरामात प्रवास करू शकतात. हे वाहन Tata आणि Mahindra कंपनीचे नसून हे वाहन फोर्स मोटर्सचे ट्रॅक्स क्रूझर आहे. ज्यामध्ये १० आणि १३ सीटर पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या वाहनाची खासियत आणि किंमत.
१३ लोकांना करता येईल एकत्र प्रवास
या नवीन Force Motors Trax Cruiser मध्ये १३ लोक एकत्र प्रवास करू शकतात. सीटबद्दल बोलायचं झाल्यास कारच्या रिअर सीट्समध्ये कॅप्टन सीट असण्याऐवजी त्यास बेंच सीटनं बदलण्यात आलं आहे. तर मागील भागात २ बाजूच्या बेंच सीट देण्यात आल्या आहेत.
(हे ही वाचा : Car Finance Plan: कार घेण्याचा विचार करताय? ‘ही’ दमदार मायलेजवाली कार आणा फक्त ७५ हजारात घरी; एवढा बसेल EMI )
Force Motors Trax Cruiser फीचर्स
या कारमध्ये शानदार इंटीरियर मिळेल. यामध्ये गोल एसी व्हेंट्ससह नवीन कॅप्टन सीट्स मिळतील. यात ७ इंचांचं टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट कन्सोल मिळेल जे अॅपल आणि अँड्रॉइडला सपोर्ट करू शकेल. सेफ्टीसाठी यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), डबल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सारखे सेफ्टी फीचर्स मिळतील.
इंजिन
Force Motors Trax Cruiser मध्ये २.६ लीटर डिझेल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे ९० एचपी पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ४ व्हील ड्राइव्हचा पर्याय देखील असू शकतो.
(हे ही वाचा : खुशखबर: कार घेण्याचा विचार करताय? १ लाखात घरी आणा Maruti Dzire; पाहा कुठे मिळतेय डील )
महिंद्राच्या थारची थेट स्पर्धा
Force Motors Trax Cruiser कारची स्पर्धा महिंद्रा थार ऑफ रोड कारशी आहे. महिंद्रा थार पुढील वर्षीच्या ऑटो एक्सपो २०२३ मध्ये महिंद्रा थार फाइव्ह डोअर व्हर्जन सादर करणार आहे.
किंमत
Force Motors Trax Cruiser च्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत दिल्ली एक्स-शोरूममध्ये रु. १६.०८ लाख आहे, जी ऑन रोड सुमारे रु. १८.०० लाख आहे.