आपलं कुटुंब जर मोठं असेल तर संपूर्ण कुटुंबाला बाहेर घेऊन जाण्यासाठी मोठ्या कारची आवश्यकता असते. त्याचबरोबर फॅमिलीसाठी नेहमीच सुरक्षित प्रवास हवा आहे. देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचं कुटुंब मोठं आहे आणि त्यांना अनेक आसन क्षमता असलेल्या कारची आवश्यकता असते. मात्र, कमी बजेट असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. तुमच्या बाबतीतही असेच असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण वाहन बाजारात फक्त सात, आठ सीटरच नव्हे तर तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी १४ सीटर कारही बाजारात उपलब्ध झाली आहे, ज्याची किमतही कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बर्‍याचदा लोक आठ साटर कारसाठी सरासरी १५ ते २५ लाख रुपये मोजतात. पण आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही फक्त १० लाख रुपयांच्या किमतीत १४ सीटर कार खरेदी करू शकाल. २५९६ सीसी इंजिन आणि ७० लिटर इंधन क्षमता असलेल्या या वाहनात चार सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १४० bhp पॉवर आणि ३२० Nm टॉर्क निर्माण करत असून या वाहनात १४ लोक बसण्याची क्षमता आहे. डिझेल इंजिनसह, हे वाहन तुम्हाला १३ किलोमीटर प्रति लीटर पर्यंत सहज मायलेज देईल, जे १४ लोकांची आसन क्षमता आणि डिझेलची किंमत लक्षात घेता खूप चांगले आहे.

(हे ही वाचा : देशातील ‘या’ स्वस्त बाईकसमोर बाकी दुचाकी पडल्या फिक्या? धडाधड होतेय विक्री, लूकही जबरदस्त )

तुम्हाला गाडीमध्ये उत्तम एअर कंडिशन मिळेल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासह प्रवास करणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल. आम्ही तुम्हाला Force Traveller 3350 Super गाडीबद्दल सांगत आहोत. हे केवळ वाहन नसून मिनी बसप्रमाणे वापरले जाते. देशातील लोकप्रिय वाहनांपैकी हे एक आहे.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हे वाहन तुमच्या वैयक्तिक वापरासाठीही वापरू शकता. या वाहनाची किंमत ११ लाख रुपयांपासून १४ लाख रुपयांपर्यत जाते.