URBANIA VAN : पुण्यातील युटिलिटी वाहन निर्माती कंपनी फोर्सने ग्राहकांसाठी नवीन Urbania van सादर केली आहे. ही व्हॅन एकापेक्षा अधिक व्हीलबेस पर्यायांसह उपलब्ध असेल, ज्यामध्ये १० सीटर, १३ सीटर आणि १७ सिटर व्हेरिएंट उपलब्ध असतील. व्हॅनची किंमत २८.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.
व्हॅन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. मीडियम व्हिलबेस १३ सीटर व्हॅनची किंमत २८.९९ लाख, शॉर्ट व्हिलबेस १० सीटर व्हॅनची किंमत २९.५० लाख आणि सर्वोच्च वैशिष्ट्ये असलेली लाँग बेस १७ सिटर व्हॅनची किंमत ३१.२५ लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत.
(लवकरच लाँच होणार ‘या’ छोट्या कार, बाजारात घालणार धुमाकूळ)
नवीन फोर्स अर्बानिआमध्ये २.६ लिटर सीआर ईडी टीसीआयसी डिजल इंजिन मिळत आहे. हे इंजिन ११४ बीएचपीची शक्ती आणि ३५० एनएमचा टॉर्क निर्माण करते. इंजिन ५ स्पीड गेअरबॉक्सशी जोडलेले आहे.
फीचर्स
फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाले, तर वाहनामध्ये एलईडी डीआरएल्ससह एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, अँड्रॉइड ऑटोप्ले आणि अॅपल कारप्लेसह ७.० टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ८ स्पिकर पर्यंतचे ऑडिओ सिस्टिम आणि एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, रिअर पार्किंग कॅमेरासह रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहे.