Virat Kohli First Car: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा महेंद्रसिंह धोनीसारखा महागड्या गाड्यांचा चाहता आहे. धोनी इतके मोठे जरी त्याचे कार कलेक्शन नसले तरी त्याच्याकडे देखील जगतील सर्वात महागड्या गाड्यांचा चांगला ताफा आहे. त्याच्याकडे Porsche, Audi, BMW, Range Rover आणि Bentley, च्या मॉडेल्ससह लक्झरी कारचा संग्रह आहे. पण अनेकांना हे देखील माहित नाही की, कोहलीने स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार कोणती आहे? स्टार स्पोर्ट्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कोहलीने आपली पहिली कार खरेदी करण्यामागील कथा उघड केली, जाणून कोणती आहे कोहलीची पहिली कार..
सामन्यापूर्वी कोहलीने मैदानावर चालवली Porsche कार
फेब्रुवारीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दिल्लीत ऑस्ट्रेलियाशी सामना होत असताना सराव सत्रादरम्यान अरुण जेटली स्टेडियमवर Porsche कार चालवताना कोहलीचे कारवरील प्रेम दिसून आले. सामन्यादरम्यान कोहली होम अवे मॅचेस म्हणजेच घरच्या मैदानावर थांबला आणि त्याच्या कारमधून स्टेडियमकडे जाण्याची संधी साधली.
(हे ही वाचा : आली रे आली! देशात नवी Lamborghini कार दाखल, स्पीड पाहून व्हाल थक्क, किंमत… )
विराट कोहलीची ‘ही’ होती पहिली कार
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कोहलीने सांगितले की, टाटा सफारी ही त्याची पहिली कार होती जी त्याने स्वतःच्या पैशाने खरेदी केली होती. हे वाहन विकत घेण्यामागचे कारण केवळ फीचर्स नसून आणखी काही होते. विराट कोहलीने सांगितले की, त्याने ही कार खरेदी केली कारण त्याला वाटले की, जेव्हा ती रस्त्यावर धावेल तेव्हा लोक आपोआप बाजूला वळतील.
कोहलीच्या कारच्या आवडीनिवडी कालांतराने बदलल्या आहेत आणि तो आता SUV ला प्राधान्य देतो, ज्यात सहसा जास्त जागा असते. मुलाखतीत कोहलीने भूतकाळात स्पोर्ट्स कारच्या आवडीचाही उल्लेख केला होता, पण आता तो वेगापेक्षा आराम आणि जागा याला महत्त्व देतो.