Manmohan Singh Car Collection: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (२८ डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी देशातील गोरगरीब, दीनदुबळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे व्यक्तिमत्त्व फार साधं होतं. परंतु, तुम्हाला त्यांच्याबद्दल एक गोष्टी माहिती आहे का? मनमोहन सिंग यांना कारमधून फिरण्याचा खूप शौक होता. मनमोहन सिंग यांनी १९९६ मध्ये मारुती 800 कार खरेदी केली होती. त्यावेळी या कारची किंमत काय होती आणि त्याचे फीचर्स काय आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
तुम्हालाही उत्सुकता लागली असेल की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही कार त्याकाळी नेमकी किती रुपयांना विकत घेतली होती? तर तेव्हा माजी पंतप्रधानांनी ही कार २१ हजार रुपयांना खरेदी केली होती, त्यापैकी २० हजार रुपये त्यांची पत्नी गुरशरण कौर यांनी दिले होते. अनेक सरकारी गाड्या मनमोहन सिंग यांच्या सेवेत होत्या, मात्र मनमोहन सिंग यांच्याकडे १९९६ सालाचं मॉडेल असलेली मारुती 800 कार होती. त्यांच्या नावावर असलेलं हे एकमेव वाहन होतं.
मारुती 800 फीचर्स
मारुती 800 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये एअर कंडिशनर, व्हिल Covers, रिअर सीट हेडरेस्ट, टॅकोमीटर, फॅब्रिक Upholstery, Adjustable हेडलॅम्प, Tinted glass, अँटी-थेफ्ट अलार्म, रिअर सीट्स बेल्ट्स, साईड इम्पॅक्ट बीम्स, Adjustable सीट्स या फीचर्सचा समावेश आहे.
हेही वाचा >> मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….
असीम अरुण यांची भावूक पोस्ट
सध्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले असीम अरुण यांनी एक्सवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची आणि त्यांची कार मारुती 800 बाबतची एक भावूक आठवण शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये असीम अरुण यांनी मारुती 800 ची आठवण सांगताना लिहिले की, “डॉक्टर साहेबांकडे फक्त एकच कार होती, ती म्हणजे मारुती 800, जी पंतप्रधानांच्या निवसस्थानात चमकणाऱ्या काळ्या BMW च्या मागे उभी असायची. मनमोहन सिंगजी मला वारंवार म्हणायचे, असीम, मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही, माझी कार ही (मारुती) आहे. मी समजावून सांगायचो की सर, ही कार तुमच्या लक्झरीसाठी नाही, तिची सुरक्षा वैशिष्ट्ये खास आहेत, त्यामुळे एसपीजीने ती घेतली आहे. पण, जेव्हा जेव्हा मारुतीच्या समोरून गाडीचा ताफा जायचा, तेव्हा ते त्याकडे अगदी मनापासून पाहत रहायचे.”