Fuel Consumption in Vehicle: जर तुमची कार वा गाडी सर्वांत कमी मायलेज देत असेल, तर त्यामागे काही सामान्य कारणे असू शकतात. तुम्हीही ‘या’ चुका करत असाल, तर सावधगिरी बाळगली पाहिजे.
१. चुकीच्या ड्रायव्हिंग सवयी
गाडी वेगाने चालवणे : अचानक एक्सेलरेट किंवा ब्रेक लावल्याने इंधनाचा वापर वाढतो. तसेच जास्त वेगाने गाडी चालविल्याने इंजिनावर जास्त दबाव येतो आणि त्यामुळे मायलेज कमी होते.
इंजिन अनावश्यकपणे चालू ठेवणे : जेव्हा गाडी सुरू असते आणि तुम्ही गाडी न चालवता इंजिन तशाच चालू अवस्थेत सोडून देता तेव्हा त्याचा मायलेजवरही विपरीत परिणाम होतो.
हेही वाचा… Types of Petrol: पेट्रोलचे नेमके प्रकार किती? तुमच्या गाडीसाठी कोणतं पेट्रोल ठरेल बेस्ट? जाणून घ्या
२. टायरमधील हवेचा दाब अचूक नसणे
जर टायरमध्ये हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल म्हणजे कमी वा जास्त असेल, तर गाडी व्यवस्थितरीत्या चालण्यासाठी इंजिनाला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे इंधनाच्या वापरात वाढ होते आणि मायलेज कमी होते.
३. इंजिनाची वाईट देखभाल
जर इंजिनचे ऑईल वेळेवर बदलले नाही किंवा एअर फिल्टर खराब झाले असेल किंवा स्पार्क प्लग खराब झाला असेल यापैकी कोणतीही बाब इंजिनाची कार्यक्षमता कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे वाहनाचे मायलेज कमी होते.
४. अतिरिक्त वजन
वाहनामध्ये गरजेपेक्षा जास्त वजन असल्यास इंजिनावर अधिक ताण पडतो आणि त्यामुळे इंधनाचा वापर वाढून मायलेज कमी होते. त्यामुळे गाडीमध्ये अनावश्यक वस्तू न ठेवल्या जाऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त दक्ष राहा..
५. चुकीच्या इंधनाचा वापर
तुम्ही वाहनात चुकीचे इंधन टाकल्यास किंवा निकृष्ट दर्जाचे इंधन वापरल्यास ते इंजिनाची कार्यक्षमता कमी करू शकते आणि मायलेजही कमी करू शकते.
या लहान-सहान गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या वाहनाचे मायलेज वाढवू शकता आणि (Fuel Consumption in Vehicle) इंधनाची बचत करू शकता.