Gaurav More New Car Features: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता गौरव मोरेने नुकतीच नवी कार विकत घेतली आहे. यावेळी त्याची कार पाहून त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. गौरव मोरेनं नवीकोरी जबरदस्त फीचर्स असलेली अन् फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली SUV कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही आनंदीची बातमी चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्याने घेतलेली ही दमदार कार कोणती आणि या कारचे जबरदस्त फीचर्स तुम्हाला माहिती आहेत का, चला तर मग जाणून घेऊया…

गौरव मोरेने खरेदी केली ‘ही’ SUV कार

अभिनेता गौरव मोरेने SUV Skoda Kylaq ही कार खरेदी केली आहे. स्कोडाने भारतीय बाजारात नवीन स्कोडा कायलाक नुकतीच लाँच केली आहे. ही कार दिसायलाही फारच आकर्षक आहे. नवीन Skoda Kylaq दिसायला Kushaq सारखी आहे, ज्याचा पुढचा आणि मागचा भाग अगदी सारखाच आहे. या कारचे डिझाइन अशा पद्धतीने केले आहे की ही कार प्रत्येकांना आकर्षित करते. या कारचे बोल्ड लूक आणि मॉडर्न एसयूव्ही, आकर्षक डिझाईन आणि टॉप टायर फीचर्स तुम्हाला आकर्षित करते.

चार प्रकारांमध्ये SUV कार दाखल

स्कोडा कायलाक ही कार चार प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीज या मॉडेलचा समावेश आहे. तसेच या कारमध्ये तुम्हाला बरेच रंगाचे पर्यायदेखील मिळतील. यामध्ये लावा ब्लू, टोर्नाडो रेड, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर आणि कँडी व्हाइटसारखे रंग आहेत. Skoda Kylaq मध्ये १० इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, आठ इंचांचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल-पॅनल सनरूफ, एक वायरलेस फोन चार्जर व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, फ्रंटच्या दोन्ही सीट तुम्ही सहा पद्धतीने इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकणार आहात…

पॉवरफूल इंजिन

Skoda Kylaq मध्ये १.० लिटर TSI पेट्रोल इंजिन आहे, जे ८५ kW ची कमाल पॉवर आणि १७८ न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. Kylaq मध्ये ६ स्पीड मॅन्युअल तसेच ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिले आहेत. यामध्ये ३८५ लिटर बूट स्पेस असून ही कार १५ kmpl पर्यंतचे मायलेज देत असल्याची माहिती आहे.

सेफ्टी फीचर्स

सुरक्षा उपकरणांबद्दल बोलायचे झाल्यास, मॉडेलला त्याच्या पॅकेजमध्ये सहा-एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, सेन्सर्ससह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि बरेच काही मिळते. फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही गाडी २५ पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाईन करण्यात आली आहे.

किंमत किती?

भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन Skoda Kylaq ची रचना करण्यात आली आहे. Skoda Kylaq कारची किंमत सुमारे ७.९ लाख ते १४.४ लाखांच्या ( एक्स-शोरुम किंमत ) घरात आहे.