इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची एंट्री झाली आहे. इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Gemopai ने भारतीय बाजारात ‘Gemopai Ryder Supermax’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर आहे जी २.७ KW ची ताकद देते. यात ६०kmph चा टॉप स्पीड आणि एकदा फुल चार्ज केल्यावर १०० किलोमीटर पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज मिळते.
Ryder SuperMax Electric Scooter बॅटरी आणि मोटर पॉवर
रायडर सुपरमॅक्समध्ये, कंपनीने १.८ kWh क्षमतेचा एक पोर्टेबल बॅटरी पॅक स्थापित केला आहे, ज्यामध्ये BLDC तंत्रज्ञानावर आधारित हब मोटर जोडण्यात आली आहे, जी कमाल २.७ KW ची शक्ती प्रदान करते. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी AIS-१५६ अनुरूप आहे. या बॅटरीसोबत कंपनीने सामान्य होम चार्जरचा पर्याय दिला आहे.
(हे ही वाचा : Mahindra च्या ग्राहकांना झटका! सर्वात स्वस्त Mahindra Thar झाली महाग, आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे )
Ryder SuperMax Electric Scooter राइडिंग रेंज आणि टॉप स्पीड
Gemopai चा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर, ही इलेक्ट्रिक स्कूटर 100 किलोमीटरची रेंज देते आणि या रेंजसह, ताशी ६० किलोमीटरचा टॉप स्पीड उपलब्ध आहे.
Ryder SuperMax Electric Scooter ब्रेकिंग सिस्टम
रायडर सुपरमॅक्स इलेक्ट्रिक स्कूटरला कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसह समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतो.
Ryder SuperMax Electric Scooter फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
EV स्टार्टअप Gemopai च्या या इलेक्ट्रिक स्कूटर रायडर सुपरमॅक्समध्ये आढळलेल्या वैशिष्ट्यांमध्ये Gemopai Connect अॅपची कनेक्टिव्हिटी समाविष्ट आहे जी या स्कूटरला कनेक्ट ठेवते. या ACE-आधारित वैशिष्ट्यामध्ये स्कूटरच्या बॅटरीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग अपडेट, स्पीड अलर्ट आणि बरेच काही समाविष्ट आहे.
(हे ही वाचा : कारसारखी की-लेस, चावीशिवायही लॉक आणि अनलॉक होणारी स्कूटर ११ हजारात खरेदी करा )
Ryder SuperMax Electric Scooter रंग पर्याय
Gemopai ने Rider Supermaxx सहा आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केले आहे जैज़ी नियॉन, दूसरा इलेक्ट्रिक ब्लू, तीसरा ब्लेजिंग रेड, चौथा स्पार्कलिंग व्हाइट,पांचवा ग्रेफाइट ग्रे आणि सहावा रंग फ्लोरेसेंट येलो आहे.
Ryder SuperMax Electric Scooter ची विक्री कधी सुरू होईल?
EV स्टार्टअप Gemopai नुसार, Rider Super Maxx १० मार्चपासून देशभरातील सर्व Gemopai शोरूममध्ये उपलब्ध असेल. २,९९९ मध्ये ई-स्कूटर Gemopai website वरून बुक करता येईल.
Ryder SuperMax Electric Scooter ची किंमत
Gemopai ने ही इलेक्ट्रिक स्कूटर ७९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किंमतीसह बाजारात लाँच केली आहे.