आपल्याकडे स्वतःची चारचाकी गाडी असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यासाठी खूप प्लॅनिंग, सेविंग केले जाते किंवा इमआयचा पर्याय स्विकारला जातो. जर तुम्ही देखील नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीच्या काही गाड्यांवर दिवाळीपर्यंत बंपर डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. कोणत्या आहेत या गाड्या आणि त्यावर किती डिस्काउंट आहे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुती सुझुकी एरीना लाईनअपच्या गाडयांवर या महिन्यात डिस्काउंट सुरू आहे. या महिन्यात मारुती सुझुकीची कार खरेदी केल्याने ४९,००० हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. भारतात आता सणांना सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांच्या दिवसात जर तुम्ही नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीच्या गाडयांवर उत्तम डिस्काउंट उपलब्ध आहे.

आणखी वाचा : अखेर प्रतीक्षा संपली! XUV 400 चा टिझर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी जाहीर केली लाँचची तारीख

मारुती सुझुकी सेलेरिओ (Maruti Suzuki Celerio)
या कारवर ४९,००० रुपयांची बचत केली जाऊ शकते. हा डिस्काउंट मॅन्युअल व्हेरीएंट्सवर मिळेल. एइमटी इक्वीप्ट मॉडेल्सवर ३४,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

मारुती सुझुकी एस प्रेसो (Maruti Suzuki S Presso)
या कारवर ४९,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. कारच्या मॅन्युअल व्हेरीएंटवर तुम्हाला ही सूट मिळू शकते. जर तुम्ही ऑटोमॅटिक वर्जन घेतले तर त्यावर ३४,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)
या महिन्यात तुम्हाला या लोकप्रिय हॅचबॅकवर ४५,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. मॅन्युअल वेरिएंटवर तुम्हाला ही सूट मिळेल. तर ऑटोमॅटिक वर्जनवर २५,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

आणखी वाचा : कशी असेल मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार? कंपनीकडून किंमत आणि फीचर्सबद्दल नवा खुलासा

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)
डिझायर ही भारतातील सर्वात लोकप्रिय सेडान कार आहे. जर ही कार यावर्षी सप्टेंबरमध्ये खरेदी केली तर तुम्ही ४०,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. एएमटी व्हेरियंट खरेदी केल्यास त्यावर २०,००० रुपये वाचवले जाऊ शकतात.

मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R)
यावर्षी सप्टेंबरमध्ये या कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर तुम्हाला ३९,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर ३४,००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.