Maruti Suzuki Cars Safety: ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने (NCAP) भारतातील सर्वात सुरक्षित कारची (Safest Cars in India Global NCAP) यादी जाहीर केली आहे. NCAP ने मंगळवारी मारुती सुझुकीच्या दोन लोकप्रिय कार ‘Alto K10’ आणि ‘WagonR’ चे सुरक्षा रेटिंग जारी केले आहे. या दोघांनी प्रौढ सुरक्षेसाठी अनुक्रमे १ आणि २ स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे. क्रॅश टेस्टमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही कारला ० स्टार देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत मारुती सुझुकीच्या या हॉट सेलिंग कारच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, कंपनीच्या गाड्या भारत सरकारने ठरवून दिलेल्या सुरक्षेच्या निकषांची पूर्तता करतात, असे सांगून मारुतीने या सुरक्षा रेटिंगला फारसे महत्त्व दिले नाही.
ग्लोबल NCAP वाहनाला त्याच्या सुरक्षिततेच्या आधारावर ० ते ५ पॉइंट्स दरम्यान रेटिंग देते. ५ स्टार रेटिंग असलेली वाहने लोकांसाठी सर्वात सुरक्षित मानली जातात. ग्लोबल NCAP च्या क्रॅश चाचणीनुसार, Alto K10 ने समोरच्या अपघातात प्रौढ व्यक्तीच्या डोक्याला आणि छातीच्या दुखापतींच्या बाबतीत सरासरी कामगिरी केली. परंतु बाजूच्या टक्करमध्ये छातीला दुखापत झाल्यास त्याची सुरक्षा कमकुवत आहे. अशा प्रकारे, अपघातात चालकाच्या छातीला डोक्याला दुखापत झाल्यास वॅगनआरची कामगिरी खराब झाली.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ कारच्या किमतीत ३० हजारांची वाढ, खरेदीसाठी ९० हजार ग्राहक वेटिंगवर)
मारुती सुझुकीने दिले उत्तर
ग्लोबल NCAP सरचिटणीस अलेजांद्रो फुरास म्हणाले, “भारतीय वाहन उत्पादक आणि काही जागतिक वाहन उत्पादकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. काही मर्यादित सुधारणा झाली असली तरी सर्वात लोकप्रिय मारुती सुझुकी मॉडेलमध्ये आम्हाला ही सुरक्षा वचनबद्धता अद्याप आढळली नाही,” ते म्हणाले की, भारतात विकल्या जाणार्या नवीन मॉडेल्ससाठी सहा एअरबॅग अनिवार्य आहेत. मारुती सुझुकीच्या लोकप्रिय मॉडेल्समध्ये अशा प्रकारची सुरक्षा वचनबद्धता दिसत नाही.
या संदर्भात मारुती सुझुकीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच जगभरातील सरकारे याबाबत नियमावली बनवत आहेत, कारण त्यांच्याकडे त्यांच्या नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. प्रवक्त्याने सांगितले, “मारुतीसाठीही सुरक्षिततेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे. भारताचे अपघात सुरक्षा नियम जवळजवळ युरोपच्या मानकांसारखेच आहेत. आमची सर्व मॉडेल्स या मानदंडांची पूर्तता करतात आणि भारत सरकारद्वारे प्रमाणित आहेत.