Global NCAP Safest Cars:  कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्स खूप महत्वाचे असतात. कारण कोणत्याही अपघाताच्या वेळी ते तुमचे प्राण वाचवण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही नवीन कार खरेदी करणार असाल तर सर्वात आधी कारची सेफ्टी फीचर्स आणि क्रॅश टेस्ट रेटिंग नक्की तपास. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या अतिशय सुरक्षित मानल्या जातात.

भारतातील सर्वात सुरक्षित कार कोणत्या आहेत, हे NCAP क्रॅश चाचणीत उघड झाले आहे. या रोख चाचणीत जीप रेनेगेड एसयूव्ही सर्वात वाईट कामगिरी करणारी होती. त्याला फक्त १ स्टार रेटिंग मिळाले. त्याचवेळी, देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार, Citroen C3 हॅचबॅक देखील NCAP क्रॅश चाचणीत अपयशी ठरली. या कार क्रॅश टेस्ट पास करू शकल्या नाहीत. NCAP कारच्या क्रॅश चाचणीबाबत अहवाल जारी करते, ज्या कार सर्वात सुरक्षित आहेत त्यांना ५ स्टार रेटिंग दिले जाते.

Maruti Swift CNG vs Tata Tiago CNG
Maruti Swift CNG vs Tata Tiago CNG: कोणती हॅचबॅक कार आहे सर्वात बेस्ट? जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरंच काही…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
High Risk Security Alert For Android Users
Android युजर्ससाठी धोक्याची घंटा! वैयक्तिक माहिती, गूगल पे, डेटाचे होईल नुकसान; फक्त ‘हा‘ एकच उपाय…
indias cheapest bikes motorcycles with 110km mileage
होंडा शाइनसह ‘या’ ३ बाईक्समध्ये मिळणार भरपूर मायलेज अन् किंमत ७० हजारांपेक्षा कमी
How to manage debt, debt, loan,
 कर्ज व्यवस्थापन कसे कराल?
history of women’s wrestling in India
Women’s Wrestling: रक्त, घाम आणि अश्रूंचा प्रवास! महिला कुस्तीपटूंची ३ दशकांची संघर्षगाथा
Nitin Gadkari statement about Indian citizens on free stuff Nagpur news
फुकटेगिरीत भारतीय सर्वाधिक..! नितीन गडकरींचे बिनधास्त बोल
Best Selling Electric Scooter
Activa, Jupiter नव्हे तर देशातील बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी

सर्वात सुरक्षित कार कोणती आहे?

कार क्रॅश चाचणीबाबत प्रोटोकॉल बदलण्यात आले आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर NCAP क्रॅश चाचणीबद्दल जाणून घ्या. नवीन प्रोटोकॉलनुसार, ज्या कारचे सेफ्टी रेटिंग चांगले आहे ती तुम्ही निवडू शकता. याच्या मदतीने तुम्ही स्वत:साठी सुरक्षित कार खरेदी करू शकाल जी अपघातातही तुम्हाला सुरक्षित ठेवेल. NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग असलेली कार सर्वात सुरक्षित मानली जाते.

(हे ही वाचा : Mercedes-Benz GLE चे धाबे दणाणले, BMW ची SUV कार नव्या अवतारात देशात दाखल, किंमत पाहून व्हाल थक्क )

NCAP क्रॅश चाचणीमध्ये कोणाला किती रेटिंग मिळाले?

ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचणीच्या नवीन प्रोटोकॉलनुसार, फोक्सवॅगन व्हरटस, स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कुशाक कार सर्वात सुरक्षित आहेत. या कारला चाइल्ड सेफ्टी आणि अॅडल्ट सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग देण्यात आली आहे. या कारना मुलांच्या सुरक्षेमध्ये ४९ पैकी ४२ गुण आणि प्रौढांच्या सुरक्षेत ३४ पैकी २९.६४ गुण मिळाले आहेत. त्याचवेळी, या कारला क्रॅशच्या वेळी ८३ पैकी ७१.६४ गुण मिळाले.

प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये किती गुण मिळाले?

महिंद्रा स्कॉर्पिओ एन कार सर्वात सुरक्षित कारच्या यादीत आहे. याला मुलांच्या सुरक्षेमध्ये ३ स्टार आणि प्रौढांच्या सुरक्षेत ५ स्टार मिळाले आहेत. कारने ८३ पैकी ५८.१८ गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, NCAP क्रॅश चाचणी नवीन प्रोटोकॉलमध्ये फोक्सवॅगन व्हरटस अव्वल आहे. त्याला प्रौढ रेटिंगमध्ये २९.७१ गुण आणि चाइल्ड रेटिंगमध्ये ४२ गुण मिळाले. तर, स्कोडा स्लाव्हियाला प्रौढ रेटिंगमध्ये २९.७१ गुण आणि बाल रेटिंगमध्ये ४२ गुण मिळाले आहेत. त्याचवेळी फोक्सवॅगन टिगॉन तिसऱ्या क्रमांकावर होती. त्याला प्रौढ रेटिंगमध्ये २९.६४ गुण मिळाले, तर कारने चाइल्ड रेटिंगमध्ये ७१.६४ गुण मिळवले. चौथ्या क्रमांकावर, स्कोडा कुशाकने प्रौढ रेटिंगमध्ये २९.६४ गुण मिळवले आणि बाल रेटिंगमध्ये ४२ गुण मिळवले.