गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने Eblu Feo नावाची पहिली बॅटरीवर चालणारी स्कूटर लॉन्च केली आहे. यानिमिताने कंपनीने इलेक्ट्रिक टू-व्हिलर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. भारतातील ईव्ही दुचाकी विभागामधील कंपनीचे हे पहिले उत्पादन आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचे प्री-बुकिंग १५ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. डिलिव्हरी २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ही स्कूटर सिंगल व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनी सध्या देशात इब्लू रोझी (ईव्ही तीन-चाकी – एल५एम), इब्लू स्पिन आणि सायकल्सची इब्लू थ्रिल (ई-बायसिकल) सेग्मेंटची विक्री करत आहे.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने लॉन्च केलेल्या Eblu Feo या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ९९,९९९ रूपये इतकी आहे. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या स्कूटरला ३ वर्षे किंवा ३० हजार किमी इतकी वॉरंटी देत आहे.
हेही वाचा : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लॉन्च होणार टोयोटा Rumion MPV; ‘या’ मॉडेल्सना देणार टक्कर
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्हणाले, “इब्लू फिओ कंपनीच्या रायपूर येथील केंद्रामध्ये स्क्रॅचमधून डिझाइन करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये डिझाइन आणि उच्च दर्जाचा आरामदायीपणा मिळतो. ही आकर्षक दरामध्ये कार्यक्षमता व सुरक्षिततेचेएकत्रीकरण असलेली कुटुंब-केंद्रित स्कूटर आहे. ईव्ही दुचाकी सेगमेंटमधील प्रवेशासह गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स भारतातील गतिशीलतेच्या भावी पिढीप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करेल.”
ते पुढे म्हणाले, “आम्हाला आमच्या विद्यमान ईव्ही पोर्टफोलिओला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. भारतभरातील प्रबळ रिटेल नेटवर्कसह आम्ही व्यापक ग्राहकवर्गाच्या मागण्यांची पूर्तता करू. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ईव्ही दुचाकी विभागाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आम्हाला विश्वास आहे की, इब्लू फिओ कुटुंबांच्या आणि भावी पिढीतील ग्राहकांच्या अपेक्षा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करेल.”
डिझाइन आणि फीचर्स
Eblu Feo या स्कूटरमध्ये साधे आणि पारंपरिक डिझाइन देण्यात आले आहे. ही स्कूटर सायन ब्लू, वाईन रेड, जेट ब्लॅक, टेली ग्रे, ट्रॅफिक व्हाईट या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्कूटरमध्ये गॅस सिलेंडर वाहून नेता येईल इतका प्रशस्त फ्लोअरबर्ड मिळतो. तसेच याचा ग्राउंड क्लिअरन्स १७० मिमी टीका आहे. फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास Eblu Feo मध्ये AHO LED हेडलॅम्प, LED टेललॅम्प, साइड स्टँड सेन्सर, नेव्हिगेशनसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स इंडिकेटर, मोबाइल चार्जिंग पोर्ट आणि ७.४ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. ज्यात तुम्हाला सर्व्हिस अलर्ट , इनकमिंग मेसेज अलर्ट , कॉल अलर्ट दर्शवतो.
या स्कूटरची बॅटरी ६० वॅटचा होम चार्जर वापरून ५ तास २५ मिनिटांमध्ये चार्ज करता येते. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स आपले ई-लोडर Eblu Reino या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च करेल. कंपनीने देशभरात ५० डिलरशिपसह नेटवर्क विस्तारामध्ये महत्वाची गुंतवणूक केली आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या अखेरीस १०० डीलर्स तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. गोदावरी Eblu Feo मध्ये २.५२ KW ली-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात एका चार्जमध्ये ही स्कूटर ११० किमी धावते.