Neeraj Chopra Car Collection : भारताचा ‘गोल्डन बॉय’ भालाफेकपटू नीरज चोप्रा सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये केलेल्या उत्तम कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर भाला फेकला. नीरज चोप्रा एक उत्तम भाळापेकपटू आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत जे त्याला फॉलो करतात. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

आज आपण नीरज चोप्राच्या कार कलेक्शनविषयी जाणून घेणार आहोत. त्याच्या जवळ पाच लक्झरी गाड्या आहेत. त्या गाड्या कोणत्या आहेत, जाणून घेऊ या. (Golden Boy Neeraj Chopra Car Collection Mahindra Thar Mahindra XUV700 Range Rover Sport ford mustang gt and many luxury cars)

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

हेही वाचा : Godawari Electric Motors : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ केली लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नीरज चोप्राचे कार कलेक्शन (Neeraj Chopra Car Collection)

नीरज चोप्राजवळ Mahindra XUV700 ही कार आहे जी त्याला आनंद महिंद्रा यांनी भेट दिली होती. या कारची किंमत २५ लाख रुपये आहेत. नीरजजवळ Mahindra Thar सुद्धा आहे ज्याची किंमत १७ लाख रुपये आहे. याशिवाय नीरजजवळ टोयोटा फॉर्च्यूनर कार सुद्धा आहे. त्याची किंमत ५१ लाख रुपये आहे. त्याच्याजवळ ७५ लाखांची फोर्ड मस्टँग GT आणि २.२० कोटींची रेंज रोव्हर स्पोर्ट गाडी सुद्धा आहे.

नीरजजवळ जवळपास चार कोटी रूपयांच्या कार आहेत. याशिवाय त्याच्याकडे हार्ले डेव्हिडसन रोडस्टर दुचाकी आणि बजाज पल्सर 220 F दुचाकी सुद्धा आहे.

Indiatime च्या एका रिपोर्टनुसार, जुलै २०२४ पर्यंत नीरज चोपडाची नेटवर्थ ३७.६ कोटी रुपये आहे. हरियाणा राज्यातल्या एका छोटाशा गावात लहानाचा मोठा झालेल्या नीरजचे पानीपत येथे आता आलीशान घर आहे. तो सर्वात जास्त पैसे जाहिरातीमधून कमावतो. तो अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिराती करतो.

हेही वाचा : Documents To Sell Your Car: तुम्हाला कार विकायची आहे? कोणती कागदपत्र लागतील? गोंधळ होऊ नये म्हणून ‘ही’ यादी पाहाच

रौप्य पदक जिंकल्यावर नीरज काय म्हणाला?

अंतिम सामन्यात नीरज चोप्रा दुखापतीने त्रस्त होता. अंतिम सामन्यात वारंवार झालेल्या फाऊलबाबत नीरजने नाराजी व्यक्त केली. “मी माझ्या कामगिरीवर खूश नाहीय आणि माझी टेक्निक आणि रनवेही चांगला नव्हता. फक्त एक थ्रो झाला, बाकीचे मी फाऊल केले. त्या दुसऱ्या थ्रोमध्ये, मला स्वतःवर विश्वास होता की मी सुद्धा एवढ्या लांब फेकू शकेन. पण भालाफेकमध्ये, जर तुमचा रनवे इतका चांगला नसेल तर भाला फार पुढे जाऊ शकणार नाही.” नीरज म्हणाला.