Mahindra Thar Roxx : थार प्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वांत प्रसिद्ध कार म्हणजेच महिंद्रा थार. ही प्रसिद्ध एसयूव्ही आता नव्या रूपात थारप्रेमींच्या भेटीला येणार आहे. महिंद्रा आपला एक मोठा ब्रॅण्ड लाँच करण्याच्या तयारीत आहे. स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल्स (SUV) निर्माण करणाऱ्या देशातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ही कंपनी त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या थार गाडीचं ५-डोअर व्हर्जन लाँच करणार आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडून थारच्या नव्या व्हर्जनचा व्हिडीओ टीझर लाँच करण्यात आला असून, या व्हर्जनला Thar ROXX असं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या कारच्या नावाबाबत अफवा पसरल्या होत्या की, तिचं नाव थार आर्मडा असेल. मात्र, त्या अफवाच असल्याचं सिद्ध झालं आहे. कारण- ही कार Thar Roxx नावानं आणली जाणार आहे.
पाच दरवाजांच्या ‘THAR ROXX चे १५ ऑगस्टला अनावरण
या कारच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Thar ROXX ही नवी कोरी कार १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर भारतात सादर केली जाणार आहे.
नव्या डिजाइनचा फ्रंट फेस
थारच्या नव्या व्हर्जनमध्ये पाच दरवाजे असल्यामुळे ही कार आधीच्या थारपेक्षा अधिक मोठी असणार आहे. या थारमध्ये पूर्णपणे नव्या डिजाइनचा फ्रंट फेस देण्यात आला आहे. महिंद्राचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष, विजेय नाकरा म्हणाले, “थार रॉक्स ही वैशिष्ट्यपूर्ण रचना, प्रीमियम भाग, प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिकता व सुरक्षितता असलेली ‘THE’ SUV आहे.
हेही वाचा >> Top 5 best-selling scooter brands: जून २०२४ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या ‘या’ पाच स्कूटर्स कोणत्या? जाणून घ्या
नवे फिचर
नवी थार १.५ लिटर डिझेल, २ लिटर डिझेल व २.२ लिटर डिझल अशा तीन पर्यायांसह बाजारात विक्रीसाठी आणली जाणार आहे. Thar ROXX मध्ये आधीच्या व्हर्जनपेक्षा अनेक वेगळी फीचर्स असणार आहेत. त्यामध्ये १०.२५ इंच लांब टचस्क्रीन, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, ३६० डिग्री कॅमेरा, पुश बटन स्टार्ट यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. Thar ROXX मधील वैशिष्ट्यांमध्ये फ्रंट आणि रियर सेंटर आर्मरेस्ट, सीट अपहोल्स्ट्री, रिअर AC व्हेंट, सहा एअरबॅग्ज व एक सनरूफ यांचा समावेश असेल. दरम्यान, थारच्या आतापर्यंतच्या व्हर्जनमध्ये फक्त फ्रंट डिस्क ब्रेक मिळत असे; मात्र पाच दरवाजांच्या या नव्या थारमध्ये रिअर डिस्क ब्रेकचे वैशिष्ट्यही असणार आहे.