देशात महामार्गावर वाढत्या अपघातांची संख्या पाहता सरकारने वाहन चालकांसाठी अनेक कडक नियम बनवले आहेत. ते नियम वाहन चालकांसाठी फार महत्वाचे असतात. कारण शासनाने दिलेल्या नियमांमध्ये आपण वाहने चालवली तर अपघात होण्याची शक्यता कमी होते. अनेक लोकं हे नियम प्रामाणिकपणे पाळतात. मात्र,काही नियम असे आहेत जे कळत न कळत आपल्याकडून मोडले जातात. त्यापैकी एक नियम ‘स्पीड लिमिट’ तुम्ही जर महामार्गावरुन प्रवास करत असाल तर तुम्हाला हा नियम नक्कीच माहित असेल.
कारण, तुमच्या कारचे स्पीड वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमची कार महामार्गावर लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये स्ट्रेस होते आणि गाडीचे ऑनलाईन चलन कट केले जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कारने स्पीट लिमिट क्रॉस केलं होतं हे, खात्यातील पैसे कट झाल्यानंतर कळते.
हेही वाचा- कार खरेदी करणाऱ्यांना दणका! खिशाला लागणार कात्री, या तारखेपासून किमती वाढणार
अशावेळी जर तुम्हाला एखादा सिग्नल मिळाला की, तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस करत आहात तर कदाचित तुमचे पैसे वाचतील आणि वाहतूक नियमांचेही पालन होईल. आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला कारचा वेग नियंत्रीत करा, असं सांगणारे गुगल स्पीडोमीटर नावाचे अॅप सध्या बाजारात आलं आहे. जे तुम्हाला तुमची कार वेगाची मर्यादा ओलांडायला लागल्यास इशारा देते. चला तर जाणून घेऊया तुम्हाला स्पीट वाढल्यावर अलर्ट करणाऱ्या गुगल स्पीडोमीटर अॅपबद्दल.
Google स्पीडोमीटर नक्की काय आहे –
हेही वाचा- इमारतीच्या बांधकामासाठी स्कुटरचा देशी जुगाड; आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का?
स्पीडोमीटर हे अॅप सध्या Google वर उपलब्ध आहे. हे अॅप तुमच्या कारच्या स्पीडोमीटर प्रमाणे काम करत. तुमच्या कारच्या मीटरमध्ये अचानक काही बिघाड झाला तर तुम्हाला वाहनांच्या वेगाचा अंदाज लागत नाही. त्यावेळी तुम्हाला वाहतूक नियम मोडल्याच्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. पण हे अॅप तुम्हाला तुमच्या कारच्या स्पीडोमीटरप्रमाणे काम करतं आणि कार किती वेगाने धावतं आहे. याची माहिती देते.
स्पीड वाढताचं देतं इशारा –
हे अॅप वापरताना तुम्हाला योग्य ते स्पीड लिमिट सेट करावं लागेल. लिमिट सेट केल्यामुळे तुम्ही गाडी चालवताना जेव्हा तुमची गाडी स्पीड लिमिट क्रॉस करायला सुरुवात करेल तेव्हा हे अॅप तुम्हाला इशारा देण्यास सुरुवात करते. त्याचवेळी मोबाईल स्क्रीनचा रंगही बदलतो जेणेकरुन तुम्हाला वेग वाढल्याचा समजेल आणि तुम्ही कारचा वेग नियंत्रित कराल. त्यामुळे साहजिकच तुमचे ऑनलाईन चलन कट होणार नाही शिवाय अपघात होण्याचा धोकाही टळेल.
हेही वाचा- चोरट्यांपासून सावधान! तुमची कार हॅक करून लांबूनच करतील स्टार्ट, कसं ते वाचा सविस्तर
हे अॅप कसे वापराल ?
- सर्वात आधी हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा.
- अॅप उघडा आणि Google नकाशा प्रोफाइलवर क्लिक करा.
- तुमची नेव्हिगेशन सेटिंग्ज उघडण्यासाठी तळाला असलेल्या सेटिंग्जवर क्लिक करा.
- ड्रायव्हिंगचा पर्याय मिळेल. त्यावर जा आणि स्पीडोमीटरवर क्लिक करा.
- या ठिकाणी फीचर चालू किंवा बंद करण्याचा पर्याय मिळेल.
- इथे तुम्ही अॅक्टीव्ह केल्यानंतर वेगमर्यादा सेट करा आणि अॅपचा वापर करा.