एप्रिल २०२२ पासून तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावासाठी १४ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. नव्या प्रस्तावानुसार १००० सीसी खासगी कार असलेल्या गाडीचा थर्डी पार्टी इन्शुरन्स नव्या प्रस्तावानुसार २,०९४ रुपये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१९-२० मध्ये हा इन्शुरन्स २०७२ रुपये होता. खासगी कार १००० सीसी ते १५०० सीसी दरम्यान असेल तर नव्या प्रस्तावानुसार इन्शुरन्स ३४१६ रुपये असेल. आता इन्शुरन्स ३,२२१ रुपये आहे. तर १५०० सीसी पेक्षा जास्त असलेल्या कारचा इन्शुरन्स ७,८९७ रुपये होईल. सध्या ७८९० रुपये इतका आहे. दुसरीकडे दुचाकी १५० सीसी ते ३५० सीसी दरम्यान असतील, तर थर्ड पार्टी इन्शुरन्स १,३६६ रुपयांपासून सुरु होईल. तर दुचाकी ३५० सीसीच्या वर असेल तर कार इन्शुरन्स २,८०४ रुपये असेल. करोना महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर सुधारित थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम १ एप्रिलपासून लागू होईल असं सांगण्यात येत आहे.
१ एप्रिल २०२२ पासून मोटार थर्ड पार्टी इन्शुरन्स महागणार!
एप्रिल २०२२ पासून तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-03-2022 at 10:02 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government propose to increase premium of third party motor insurance from april 2022 rmt