भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची झपाट्याने वाढणारी मागणी लक्षात घेता, जवळपास प्रत्येक वाहन उत्पादक त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्स लॉन्च करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची बाजारात उपलब्ध आहे. खिशाला परवडणाऱ्या किंमतीपासून महागड्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. अशाच एका इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हैदराबादमधील स्टार्टअप ग्रॅवटनची इलेक्ट्रिक स्कूटर ग्रॅवटन क्वांटाबद्दल जाणून घेणार आहोत. ही एक इलेक्ट्रिक मोपेड बाईक आहे. ही इलेक्ट्रिक मोपेड ९९ हजार रुपयांपासून उपलब्ध आहे. आकर्षक तीन रंगात ही इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहे. यात लाल, पांढरा आणि काळा रंग आहे.

या इलेक्ट्रिक मोपेडच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये सीबीएस मानकांसह डिस्क ब्रेकचे दिले आहे. खराब रस्त्यांवर चांगल्या सस्पेंशनसाठी, याच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर देण्यात आले आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत ९९ हजार रुपये आहे परंतु केंद्र सरकार देत असलेल्या अनुदानानंतर ही किंमत बरीच कमी होते. तुम्हाला हे इलेक्ट्रिक मोपेड विकत घ्यायचे असल्यास, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते बुक करू शकता किंवा तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन थेट खरेदी करू शकता. या इलेक्ट्रिक मोपेडच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने ३ किलोवॅट बीएलडीसी तंत्रज्ञानावर आधारित हब मोटरसह ३ किलोवॅट लिथियम आयन बॅटरी पॅक दिला आहे.

बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, फास्ट चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी ९० मिनिटांत पूर्ण चार्ज होते. तर सामान्य चार्जरने चार्ज होण्यासाठी तीन तास लागतात. कंपनीच्या मते, या इलेक्ट्रिक मोपेडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक रिब केज चेसिसवर बनवण्यात आली आहे ज्यामध्ये दोन बॅटरी आरामात बसवता येतात. या इलेक्ट्रिक मोपेडच्या रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, एका बॅटरीवर पूर्ण चार्ज केल्यानंतर ती १५० किमीची रेंज देते. तर डबल बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक ३०० किमीची लांब रेंज देते.

Story img Loader