Gravton Quanta electric bike: भारतात इलेक्ट्रिक वाहनांबाबत ऑटो कंपन्या गेल्या काही दिवसांमध्ये चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्यात. त्यामुळे भारताच्या ऑटो सेगमेंटमध्ये सतत नवनवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच होत आहेत. अशात दिवसेंदिवस पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटची डिमांड देखील वाढली आहे. अशातच हैदराबाद स्थित स्टार्टअप EV ब्रँड Gravton Motors भारतीय बाजारपेठेत शक्तिशाली रेंजसह ‘Gravton Quanta’ इलेक्ट्रिक बाईक विकते. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक बाईक केवळ ८० रुपयांमध्ये ८०० किमी पर्यंत चालवता येते. म्हणजेच १०० किमीपर्यंत ही बाईक चालवण्यासाठी तुम्हाला फक्त १० रुपये खर्च येईल.
‘या’ बाईकमध्ये काय आहे खास?
यामध्ये कंपनीनं 3kWh Li-ion बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये बाईक १५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. यामध्ये एकत्र दोन बॅटरी ठेवण्यासाठीही एक विशेष सुविधा देण्यात आली आहे. याचाच अर्थ एका चार्जिंगमध्ये तुम्ही ३२० किमीपर्यंत जाऊ शकता.
(हे ही वाचा : Electric Vehicle: आता पाण्यापासून बनवलेल्या बॅटरीवर एका चार्जमध्ये गाठा २,००० किमी; अन् किंमतही कमी )
टॉप स्पीड ७० किमी
ही बाईक एकून तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 3KW ची BLDC मोटर देण्यात आली आहे. ही मोटर १७०Nm चा टॉर्क जनरेट करते. या बाईकचा सर्वाधिक वेग ७०Kmph आहे. फास्ट चार्जिंग फीचरद्वारे Gravton Quanta मधील बॅटरी ९० मिनिटात पूर्ण चार्ज होते. कंपनीनुसार, ही बॅटरी साधारण १ किमी./मिनिटप्रमाणे चार्ज होते. तर, सामान्य मोडमध्ये बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ३ तासांचा वेळ लागतो. Gravton Quanta सोबत ५ वर्ष बॅटरी वॉरंटीदेखील कंपनी देत आहे. ही बॅटरी सिंगल चार्जिंगमध्ये १५० किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. दोन बॅटरी लावण्याची सोय असल्यामुळे एका चार्जिंगमध्ये एकूण ३२० किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज मिळते.
(हे ही वाचा : एक-दोन नव्हे, तर चक्क ५० हजारांनी स्वस्त झाली ‘ही’ जबरदस्त बाईक; जाणून घ्या नवीन किंमत )
फीचर्स
Gravton Quanta या इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये १७ इंचाचे व्हील्स असून दोन्ही व्हील्सना डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. शिवाय डिजिटल डॅशबॉर्ड आणि ऑल-LED लायटिंग असे फीचर्स आहेत. ही बाइक Quanta Smart अॅपद्वारेही कनेक्ट करता येणं शक्य असून यामध्ये रोडसाइड असिस्टंट, मॅपिंग सर्विस स्टेशन, रिमोट लॉक/अनलॉक आणि लाइट बंद किंवा ऑन करण्याची सुविधा मिळते. तसेच, Gravton Quanta मध्ये व्हेइकल ट्रॅकिंग हे फीचरही आहे. त्यामुळे गाडी चोरी झाल्यानंतरही ट्रॅक करता येते.
किंमत
कंपनीच्या वेबसाइटवर या बाईकची किंमत १,१५,००० रुपये आहे.