पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता यामुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. हे लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या सेगमेंटमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. अलीकडेच ग्रेटा इलेक्ट्रिकने आपली स्कूटर Greta Glide भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही स्कूटर सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीने लिथियम आयन बॅटरीचा एक पॅक दिला आहे जो २.५ तासात पूर्ण चार्ज होतो आणि एका चार्जमध्ये १०० किमी पर्यंतची रेंज देतो. ग्रेटा इलेक्ट्रिकने आपल्या ग्लाइड इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये DRL, EBS, ATA सिस्टीम सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. यासोबतच या स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस स्टार्ट आणि अँटी थेफ्ट सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. या स्कूटरला फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, लाइट डिझायनर कन्सोल आणि एक्स्ट्रा-लार्ज लेक फॉर्म देण्यात आला आहे. दुसरीकडे, ग्रेटा ग्लाइड इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ओला इलेक्ट्रिक प्रमाणे रिव्हर्स ड्राइव्ह मोड, तीन स्पीड ड्रायव्हिंग मोड देखील दिले आहेत. याशिवाय या स्कूटरमध्ये My Vehicle अलार्म, ब्लॅक लेदरेट सीट कव्हर आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील दिलं आहे.
ग्रेटा इलेक्ट्रिकने ग्लाइड इलेक्ट्रिक स्कूटर चार प्रकारांमध्ये लाँच केली आहे. यामध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर ६० आणि १०० किमीची रेंज देते. ग्राहकांना ३ वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. यलो, ग्रे, ऑरेंज, स्कार्लेट रेड, रोझ गोल्ड, कँडी व्हाइट आणि जेट ब्लॅक कलर ऑप्शन्स सारख्या सात रंगांच्या पर्यामध्ये पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
- V2 48v-24Ah बॅटरीतून ६० किमी रेंज
- V2+60v-24Ah बैटरी में मिलेगी ६० किमी रेंज
- V3 48v-30Ah बैटरी में मिलेगी १०० किमी रेंज
- V3+60v-30Ah बैटरी में मिलेगी १०० किमी रेंज
MG ZS EV 2022 इलेक्ट्रिक एसयूव्हीचं फेसलिफ्ट वर्जन भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या
Greta Glide इलेक्ट्रिक स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची किंमत ८० हजार रुपये आहे. या स्कूटरच्या प्री-ऑर्डरवर कंपनीकडून ६ हजार रुपयांची सूट दिली जाईल. त्याचबरोबर या स्कूटरवर प्री-बुकिंगवर २ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.