दिवसेंदिवस स्मार्ट कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. सामान्य कार खरेदी केल्यावर स्मार्ट फिचर्सची सुविधा मिळत नाही. पण तुम्ही जर स्मार्ट कार खरेदी केली, तर त्या कारमध्ये अनेक जबरदस्त यंत्रणेचे फिचर्स पाहायला मिळतील. पण अशा सुविधांचा धोकाही तितकाच असतो. कारण तुमची कार हॅक होऊन त्यामध्ये असलेला डेटा चोरी होऊ शकतो. अशाचा प्रकारची एक वल्नरेबिलिटी समोर आली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं हॅकर्स स्मार्ट कारला हॅक करू शकतात.
इंटरनेट आणि आर्टिफिशल इंटेलिजेंसचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे फक्त मोबाईल फोनंच स्मार्ट होत नाहीत, तर टीव्ही आणि कारंही स्मार्ट बनवले जात आहेत. स्मार्ट कार असो किंवा स्मार्ट डिवाईस, या सर्व गोष्टी दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतात. पण या गोष्टींमुळं धोकाही तितकाच आहे. कारण अशा गोष्टींमुळं व्हायरस किंवा मालवेयरचा धोका उद्भवतो. मोबाईल फोन हॅक होण्याची अनेकांना भीती असते. पण यामध्ये टीव्ही, वायफाय कॅमेरा, कारचाही आता समावेश झाला आहे. स्मार्ट कारशी संबंधित एक सिक्योरिटी वल्नरेबिलिटीबाबत माहिती समोर आली आहे. या माहितीच्या मदतीने हॅकर्स स्मार्ट कार्सच्या अनेक फिचर्सना नियंत्रित करु शकतात.
हॅकर लांबूनच स्टार्ट करु शकतात तुमची कार
सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने एक सिक्योरिटी वल्नरेबिलिटीची माहिती समोर आणली आहे. यामध्ये होंडा, निसान, Infinity आणि Acura सारखी वाहनेही पाहायला मिळू शकतात. या सर्व कारमध्ये Sirusxm चे कनेक्टेड व्हीकल सर्विसचा वापर केला आहे. वल्नरेबिलिटीच्या कारणास्तव हॅकर सहजरित्या या कार्सचा अॅक्सेस मिळवू शकतात. रिसर्चर सॅम क्युरीने ट्विटरवर याबाबत माहिती शेअर केली आहे. या समस्येमुळं हॅकर्स कारला अनलॉक करू शकतात. तसंच कारला स्टार्ट करणं, कारचं लोकेशन, तसंच कारचं हॉर्नही सहजपणे वाजवू शकतात. यासाठी हॅकर्सला फक्त VIN म्हणजे व्हीकल आयडेंटिफिकेशनच्या नंबरची आवश्यकता असते.
एक कोटीहून जास्त कार्समध्ये या तंत्रज्ञानाचा वापर
Sirius XM ची कनेक्टेड व्हीकल सर्विस उत्तर अमेरिकेच्या एक कोटींहून अधिक कारमध्ये उपलब्ध आहे. या सर्विसचा वापर BMW, होंडा, ह्युंदाई, इनफिनिटी, जग्वार, लॅंड रोवर, लेक्सस, निसान आणि टोयोटाच्या कार्समध्ये केला आहे. या सिस्टमला सेफ्टी, सिक्योरिटी आणि अन्य काही कन्वेंस सर्विसेसला एनेबल करण्यासाठी वापरलं जातं. याच्या मदतीने कारमध्ये ऑटोमॅटिक क्रॅश नोटिफिकेशन, एन्हांस रोडसाइड असिस्टेंट, रिमोट डोर अनलॉक, रिमोट इंजन स्टार्ट, स्टोलेट व्हीकल रिकव्हरी असिस्टंट, टर्न बाय टर्न नेविगेशन आणि स्मार्ट होम डिवायसेस इंटीग्रेशनची सुविधा मिळते.
या कारणामुळं हॅकर्सला टेलीमॅटिक प्रोगाम मध्ये जाण्याची संधी मिळते. याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या डिटेल्स गोळा करु शकतात. एव्हढंच नाही VIN च्या सोबत एक HTTP रिक्वेस्ट पाठवून हॅकर्स कारला हॅक करू शकतात. वॉर्निंग अलार्म तंत्रज्ञान आणि वल्नेरेबिलिटीचा धोका भारतात वापरल्या जाणाऱ्या कार्ससाठी आता नसू शकतो, पण ही एक सूचना आहे. कनेक्टेड कार्स आणि स्मार्ट कार्सच्या मागणीत वेगानं वाढ होत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्यासाठी नक्कीच आहे, परंतु यामुळे कार हॅक होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.