देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक लोक इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहेत. इलेक्ट्रिक कार या सामान्य कारच्या तुलनेत महाग आहेत. मात्र, ही कार चालवण्याचा खर्च खप कमी आहे. सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे १५ लाख रुपये दरम्यान आहे. सर्वधारण इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये जास्तीत जास्त ५०० किमी अंतर कापतात. पण तुम्हाला एका चार्जवर २००० किमी अंतर कापणारी लवकरच इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत दिसून येणार आहे. तर तिची किंमतही कमी असणार असल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वस्त आणि पर्यावरणपूरक असेल बॅटरी

euronews.com या वेबसाइटनुसार, शास्त्रज्ञांनी समुद्राच्या पाण्यापासून एक बॅटरी बनवली आहे जी सध्याच्या लिथियम बॅटरीपेक्षा खूपच स्वस्त आणि चारपट अधिक शक्तिशाली आहे. पॉवरफुल म्हणजे ही बॅटरी लिथियम बॅटरीपेक्षा चारपट जास्त ऊर्जा साठवू शकते. वास्तविक, या बॅटरीमध्ये सोडियम-सल्फरचा वापर करण्यात आला आहे. हे एक प्रकारचे वितळलेले मीठ आहे जे समुद्राच्या पाण्यापासून बनवले जाते. ही बॅटरी लिथियमपेक्षा खूपच स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे.

(हे ही वाचा : Electric Vehicle Charging: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली; ‘या’ भन्नाट अॅपमुळे मिनिटांत मिळेल तुम्हाला चार्जरचे लोकेशन)

अक्षय ऊर्जा क्षेत्रात येणार क्रांती

या यशाकडे अक्षय ऊर्जा क्षेत्रातील क्रांती म्हणून पाहिले जात आहे. सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी ही बॅटरी बनवली आहे. आघाडीचे संशोधक डॉ. शेनलाँग झाओ म्हणतात की, सध्याच्या लिथियम बॅटरीच्या तुलनेत या सोडियम बॅटरीची किंमत खूपच कमी आहे आणि त्यात चारपट जास्त ऊर्जा साठवण्याची क्षमता आहे. येत्या काळात या बॅटरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले तर त्याची किंमत बऱ्यापैकी कमी होईल.

नवीकरणीय ऊर्जेसाठी बॅटरी महत्त्वाच्या का आहेत?

आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या संकटाचा सामना करत आहे. आज सर्वत्र हवामानाचे तापमान कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला जात आहे. अक्षय ऊर्जेचे दोन सर्वात महत्त्वाचे स्त्रोत म्हणजे पवन आणि सौर. पवन आणि सौर ऊर्जा नेहमी उपलब्ध नसते, त्यामुळे ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत बॅटरीमध्ये जितकी जास्त ऊर्जा साठवता येईल, तितक्या वेगाने जग अक्षय ऊर्जेकडे वाटचाल करेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half the price and 2000 km range electric cars will run thousands of miles on a single charge with a battery made of water pdb