सणासुदीच्या काळात ग्राहकांचा उत्‍साह वाढवण्यासाठी हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वांत मोठी मोटरसायकल व स्कूटर उत्पादक कंपनी हार्ले-डेव्हिडसन X440 या आपल्या पहिल्या सह-विकसित प्रीमियम मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करण्यास सज्ज झाली आहे. नवरात्रीच्या मंगल समजल्या जाणाऱ्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२३ रोजी डिलिव्हरी सुरू होणार आहे.

हार्ले-डेव्हिडसन X440 सध्या हिरो मोटोकॉर्प्सच्या गार्डन फॅक्टरी नावाने ओखळल्या जाणाऱ्या कारखान्यात उत्पादित केली जात आहे. भारतातील राजस्थानामधील नीमराणा येथे हा कारखाना आहे. पूर्वआरक्षण केलेल्या ग्राहकांसाठी कंपनीने १ सप्टेंबर २०२३ पासून टेस्ट राइड्स सुरू केल्या आहेत.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

येथे करा बुकींग

नवीन बुकिंग विंडो १६ ऑक्टोबरपासून खुली होत असून, ग्राहक देशभरातील हार्ले-डेव्हिडसनच्या सर्व डीलरशिप्सवर किंवा निवडक हिरो मोटोकॉर्प आउटलेट्समध्ये जाऊन बुकिंग करू शकतात. ग्राहक http://www.Harley-Davidsonx440.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंगही करू शकतात.

(हे ही वाचा : तुमच्या बाईक अन् मोपेडमध्ये डिझेल इंजिन का दिले जात नाही? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण )

हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. निरंजन गुप्ता म्हणाले, “हार्ले-डेव्हिडसन X440ने देशभरात उत्‍साह निर्माण केला आहे. नीमराणा कारखान्यात उत्पादनाचे काम पूर्ण उत्‍साहात सुरू आहे आणि प्री-बुकिंग केलेल्या आमच्या अनेक ग्राहकांनी मोटरसायकलच्या टेस्ट राइडची संधीही घेतली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हार्ले डेव्हिडसन X440च्या डिलिव्हरीज सुरू करून सणासुदीच्या उत्साहात भर घालण्यास आम्ही सर्व सज्ज आहोत, असे त्यांनी नमूद केले.

हर्ले-डेव्हिडसन X440 जुलै २०२३ मध्ये सर्वांसमोर आल्यापासून भारतभरातील अव्वल श्रेणीतील ग्राहकांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे. म्हणूनच केवळ महिनाभरात २५००० बुकिंग्ज झाली आहेत. हिरो मोटोकॉर्पने पहिल्या ग्राहकांच्या समूहाला सेवा देण्यासाठी सध्या ऑनलाइन बुकिंग विंडो तात्पुरती बंद केली आहे.

किंमत किती

ही मोटरसायकल Denim, Vivid आणि S अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, तर तिची किंमत २,३९,५००/- रुपये (Denim), २,५९,५००/- रुपये (Vivid) आणि २,७९,५००/- रुपये (S) अशा किमतींना उपलब्ध आहे.