हार्ले-डेविडसन ही एक अमेरिकन कंपनी आहे. ही कंपनी दुचाकींचे उत्पादन करते. ही कंपनीला यंदा १२० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा आनंद साजरा करत असताना हार्ले डेविडसनने ६ नवीन लिमिटेड एडिशन लाँच केले आहेत. कंपनीने २०२३ मध्ये आपल्या मोटारसायकल लाईनअपचे लाँचिंग केले आहे. १२० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या बाईक लाँच करण्यात आल्या आहेत.
हार्ले-डेव्हिडसनच्या लाइनअपमध्ये ब्रेकआउट क्रूझर मॉडेल, नवीन नाइटस्टर स्पेशल मिडलवेट मोटारसायकल, रोड ग्लाइड 3 ट्रायक मॉडेल, रिस्टाइल केलेले आणि ब्लॅक-आउट फ्रीव्हीलर ट्राइक या मॉडेल्सचा समावेश आहे. १२० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लाँच करण्यात आलेल्या मोटारसायकलमध्ये CVO रोड ग्लाइडमध्ये अॅनिव्हर्सरी ब्लॅक बेस कोटवर हेयरलूम रेड पॅनेल्स मिळतात. तसेच यात सोन्याच्या रंगाचे स्कॅलॉप डिझाइन आणि गोल्ड-प्लेटेड टँक मेडलियन देखील वापरकर्त्यांना बघायला मिळणार आहेत. जागतिक वितरणासाठी मोटारसायकलचे केवळ १५०० युनिट्स तयार करण्यात येणार आहे. तसेच या मोटारसायकलवर टँक कन्सोलवर लेझरने डिझाईन केलेला सिरीयल नंबर पण असणार आहे.
१२० व्या वर्धापन दिनानिमित्त लाँच करण्यात आलेले ६ लिमिटेड एडिशन हे वेगळ्या व नवीन पेंट स्कीममध्ये उपलब्ध होणार आहेत. हे डिझाईन हार्ले डेविडसनच्या सुरुवातीच्या मोटारसायकलसारखे तयार करण्यात आलेले डिझाईन आहे. जागतिक स्तरावर अल्ट्राचे १,३०० युनिट्स, ट्राय ग्लाइड अल्ट्रा अॅनिव्हर्सरीचे १,११० युनिट्स, स्ट्रीट ग्लाइड स्पेशल अॅनिव्हर्सरीचे १,६०० युनिट्स , हेरिटेज क्लासिक ११४ चे १,७०० युनिट्स तयार करण्यात येणार आहेत.
काय आहेत फीचर्स ?
या लिमिटेड एडिशन्समध्ये वापरकर्त्यांना अनेक फीचर्स मिळणार आहेत. फॅट बॉय, फॅट बॉब, ब्रेकआउट, लो रायडर एस मॉडेल्ससाठी इलेक्ट्रॉनिक क्रूझ हे एक नवीन फिचर असणार आहे. तर , लो रायडर एसटी, हेरिटेज क्लासिक आणि स्पोर्ट ग्लाइड मॉडेल हे त्यांच्या नेहमीच्या मॉडेलमधील फीचर्सप्रमाणेच लाँच होणार आहेत. तसेच यामध्ये ब्रेकआऊट , लो रायडर एस आणि लो रायडर एसटी या मॉडेल्ससाठी ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (Traction control system) देण्यात येणार आहे. जे एका स्वीचवर चालू किंवा बंद करता येणार आहे.