Having trouble starting your car in winter: हिवाळा सुरू झाला असून सध्या राज्यभरात कडाक्याची थंडी पडली आहे. या दिवसात आरोग्यासह वाहनांचीही खूप काळजी घ्यायला हवी. अनेकदा थंडीमुळे वाहनं सुरू करताना खूप त्रास होतो. अनेक वेळा लोक त्यात तासनतास घालवतात, त्यानंतरही वाहन सुरू होत नाही. तसे हे विशेषतः तेव्हा घडते, जेव्हा एखादे वाहन गॅरेजमध्ये किंवा घराच्या पार्किंगमध्ये महिन्यांपासून पडून असते. दीर्घकाळ वापर न केल्यामुळे अशा समस्या उद्भवतात. तुमचेही एखादे वाहन महिनोनमहिने बंद पडलेले आहे आणि ते क्षणार्धात चालू करायचे असेल तर यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज नाही. या टिप्सच्या मदतीने तुम्ही बरेच दिवस थांबलेले वाहन सुरू करू शकता.

या टिप्स करा फॉलो

वेळेवर सर्व्हिसिंग

Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Convert old car into new upgrade your car by using these tips
वर्षानुवर्षे एकच गाडी वापरून तुम्हाला कंटाळा आला आहे का? मग अगदी स्वस्तात बनवा तुमची कार नवीकोरी, जाणून घ्या ‘या’ टिप्स
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
What is best time to change car engine oil for maximum performance
कार घेतलीय पण ‘ही’ गोष्ट अजूनही माहित नाही! जाणून घ्या, गाडीचे ‘इंजिन ऑइल’ किती दिवसांनी बदलावे…
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री

ज्या गाड्यांची सर्व्हिसिंग वेळेवर होत नाही, अशा वाहनांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सर्व्हिसिंग आवश्यक आहे. कारण इंजिनमध्ये वापरलेले इंजिन तेल जास्त वापरानंतर घट्ट होते आणि हिवाळ्याच्या हंगामात ते गोठण्याची शक्यता असते.

इंधन तपासा

गाडी सुरू करण्यात काही अडचण येत असेल तर सर्वप्रथम पेट्रोल तपासा. जास्त काळ वापर न केल्यास पेट्रोलचे बाष्पीभवन होते. सीएनजी कार सुरू करण्यासाठी त्यामध्ये पुरेसे पेट्रोल असणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच सीएनजीवर चालवण्यासाठीही पेट्रोल आवश्यक आहे.

गाडीची बॅटरी तपासा

गाडीची बॅटरी आणि इंजिन प्रामुख्याने थंड हवामानात प्रभावित होऊ शकते, त्यामुळे गाडी सुरू करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. बॅटरी जुनी असेल तर ती बदला, अन्यथा बॅटरीच्या सर्व केबल्स आणि त्यामधल्या पाण्याची पातळी तपासा.

बोनेट उघडून तपासा

पेट्रोल आणि सीएनजी असूनही एखादे वाहन सुरू होत नसेल तर सर्वप्रथम बोनेट उघडून बॅटरी तपासा. हिवाळ्यात जास्त वेळ गाडी न चालवल्यास बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते. बोनेट उघडल्यानंतर बॅटरीला जोडलेल्या तारा एकदा तपासा. काही वेळा त्यात गंज लागल्याने वाहन सुरू होत नाही.

हेही वाचा: हिवाळ्यात बाईक चालवण्यापूर्वी ‘या’ पाच टिप्स नक्की वाचा

टायर्सची काळजी घ्या

प्रत्येक ऋतूत टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात टायर्समधील हवेचा दाब योग्य असला पाहिजे, कारण थंड वातावरणात आर्द्रतेमुळे रस्ते ओले राहतात आणि ओल्या रस्त्यावर घसरण्याची भीती वाढते. टायर खूप झिजले असतील तर ते बदलून घ्या.

Story img Loader