देशाच्या कार क्षेत्रात सर्वाधिक मागणी हॅचबॅक कारची आहे. आकर्षक लूक आणि मायलेजमुळे या गाड्यांना सर्वाधिक पसंती आहे. जर तुम्ही कमीत कमी किमतीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर देशातील टॉप ती सर्वात स्वस्त कारचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या. जेणेकरुन तुम्ही तुमच्यासाठी योग्य कार निवडू शकाल.
Maruti Alto 800: मारुती अल्टो 800 ही या यादीतील सर्वात स्वस्त कार आहे. कंपनीसह देशातील सर्वात कमी किमतीची हॅचबॅक देखील आहे. कमी किमतीत चांगल्या मायलेजसाठी या कारला पसंती दिली जाते. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे तर यात ०.८ लीटर ७६९ सीसी इंजिन आहे, जे ४८ पीएस पॉवर आणि ६९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५- स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार पेट्रोलवर २२.०५ किमी आणि सीएनजीवर ३१.५९ किमीचा मायलेज देते. अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, पॉवर विंडो, ड्रायव्हरच्या सीटवर एअरबॅग, मागील पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि EBD सारखी वैशिष्ट्ये कारमध्ये देण्यात आली आहेत. कंपनीने हा मारुती अल्टो 800 ची सुरुवातीची किंमत ३.२५ लाख रुपये असून टॉप मॉडेलमध्ये ४.९५ लाखांपर्यंत जाते.
Datsun redi-GO: डॅटसन रेडी गो ही या यादीतील दुसरी स्वस्त कार आहे जी मायलेज आणि स्टाईलसाठी पसंत केली जाते. कंपनीने त्याचे तीन व्हेरियंट बाजारात आणले आहेत. कारमध्ये ९९९ सीसी ०.८ लिटर पेट्रोल इंजिन आहे जे ५४ पीएस पॉवर आणि ७२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कारच्या मायलेजबद्दल डॅटसनचा दावा आहे की ही हॅचबॅक २२ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. कारमध्ये ८-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, ड्रायव्हर साइड एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. डॅटसनने ही कार ३.९७ लाख रुपयांपासून टॉप व्हेरियंटमध्ये ४.९५ लाख रुपयांपर्यंत जाते.
Maruti S-Presso: मारुती एस-प्रेसो ही या देशातील सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही आहे. ही गाडी डिझाइन, मायलेज आणि फिचर्ससाठी पसंत केली जाते. कंपनीने या एसयूव्हीचे तीन व्हेरियंट बाजारात लाँच केले आहेत. या एसयूव्हीमध्ये ९९८ सीसी १ लिटर पेट्रोल इंजिन आहे जे ६८ पीएस पॉवर आणि ९० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मायलेजबद्दल, मारुती सुझुकीचा दावा आहे की ही गाडी पेट्रोलवर २१.४ किमीचा मायलेज देते. ही सीएनजीवर ३१.२ किमीचा मायलेज देते. अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, फ्रंट विंडो, कीलेस एंट्री, रिअर पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर साइड एअरबॅग, स्पीड अलर्ट, ABS, EBD आणि फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखी वैशिष्ट्ये कारमध्ये देण्यात आली आहेत. मारुती सुझुकीने ही कार ३.८५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह टॉप व्हेरिएंटमध्ये जाताना ५.५६ लाख रुपयांपर्यंत जाते.