देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Hero MotoCorp ने आपली सर्वात शक्तिशाली, आयकॉनिक आणि लोकप्रिय बाईक Karizma XMR 210 नवीन अवतारात नुकतीच देशात दाखल केली आहे. जिथं तिची किंमत तुमच्या खिशाला परवडेल इतकीच असल्याचं समोर आलं. पण आता आता भारतीय मोटारसायकल ब्रँडने XMR च्या किमतींमध्ये किंचित वाढ जाहीर केली आहे, जी १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होईल, अशी माहिती आहे.
Karizma XMR 210 कशी आहे खास?
Hero MotoCorp ने अलीकडेच Karizma XMR लाँच केले आहे. आकर्षक डिझाईन, चांगले फीचर्स आणि चांगली कामगिरी यामुळे बाईकला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यावर भाष्य करताना Hero MotoCorp चे मुख्य व्यवसाय अधिकारी रणजीवजीत सिंग म्हणाले, “नवीन करिझ्मा XMR ने आधीच ग्राहकांमध्ये खूप उत्साह निर्माण केला आहे. करिझ्मा एक्सएमआरचे उत्पादन आधीच सुरू झाले आहे आणि लवकरच हीरो मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करेल. आयकॉनिक यलो, फँटम ब्लॅक आणि मॅट रेडसह तीन रंग पर्यायांसह XMR ऑफर केले आहे.
(हे ही वाचा : नवीन कार घेताय? मग घाई करा, पुढील महिन्याच्या १ तारखेपासून ‘या’ लोकप्रिय कार महागणार, किती पैसे मोजावे लागणारे? )
या बाईकमध्ये १७ इंचांचे अलॉय व्हील्स, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी, समोरच्या बाजूला सिंगल पेटल-प्रकारची डिस्क आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक आहे, जो ड्युअल-चॅनेल ABS सह आहे. बाईक १७ इंची अलॉय व्हीलवर चालते. यात अॅडजस्टेबल विंडशील्ड, ऑल-एलईडी लाइटिंग, ५-इंच फुल-डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कॉल आणि मेसेज अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळते.
बाईकच्या किमतीत किती झाली वाढ
Karizma XMR ला सुरुवातीची किंमत १.७३ लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये आणल्या गेले. पण, नवीन किंमत आता १.८० लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. म्हणजेच सात हजार रुपयांची वाढ होणार आहे.