Best-selling two-wheeler brands in July 2024: भारतात बजेट बाईकच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कमी बजेटमध्ये अधिक फीचर्स  आणि जबरदस्त मायलेज, यामुळे ग्राहक बाईकला मोठी पसंती देत आहेत. भारतात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकी किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. चांगलं मायलेज देणार्‍या दुचाकी लोकांना आकर्षित करत आहेत. यामुळेच गेल्या एका महिन्यात म्हणजेच ३० दिवसांत एका प्रसिध्द कंपनीच्या बाईकने भारतीय बाजारात विक्रीत बाजी मारली आहे.

बजाज सारख्या दुचाकी वाहनांनी जुलै २०२४ मध्ये भारतातील दुचाकी विक्रीत मोठी उडी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत या वर्षी विक्रीत १७.१७% वाढ झाली आहे, हे मागील महिन्याच्या जून २०२४ च्या विक्रीपेक्षा ४.९१% अधिक आहे. जुलै २०२४ मध्ये कोणत्या कंपनीच्या बाईकला सर्वाधिक पसंती मिळाली, जाणून घेऊया…

Petrol Diesel Price Changes
Petrol Diesel Price Changes : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण? वाचा किती रुपयांनी कमी झाला इंधनाचा दर
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
TVS Raider iGO variant launched know its features price mileage and ride modes
बजाज पल्सरला टक्कर द्यायला आली ‘TVS’ची ही बाईक, जास्त मायलेजसह मिळतील खास फिचर्स
Diwali Discount On Aprilia Bike
Diwali Discount On Aprilia Bike : झिरो डाउन पेमेंट, तीन वर्षांची वॉरंटी आणि बरंच काही… दिवाळीत ही खास बाईक खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी
fraud with businessman in Buldhana by investing in stock market
सावधान! ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवण्याचा बेत? आधी ही बातमी वाचा
buffalo Viral Video
‘भावा, कर्म तुला सोडणार नाही…’ तरुणांनी म्हशींबरोबर घेतला पंगा, पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक
Hyundai Motor IPO
Hyundai Motor IPO : ह्युंदाई मोटरचा शेअर १,९३१ रुपयांना मुंबई शेअर बाजारात दाखल; आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ
Bharat Products salse at reliance retail
Bharat Brand: ‘भारत ब्रँडच्या वस्तू आता रिलायन्स रिटेलमध्ये विकल्या जाणार’, केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

हिरो मोटोकॉर्प

प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ही केवळ भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी नाही तर जगातील सर्वात मोठी स्कूटर आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. Hero Motocorp ने स्वस्त आणि चांगल्या प्रोडक्शनच्या आधारे भारतातील तसेच जगभरातील दुचाकी बाजारात सर्वाधिक ओळख निर्माण केली आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हिरोचाच दबदबा आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक मार्केट शेअरसह ही नंबर-१ टू-व्हिलर बनली कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत हिरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. हिरोने जुलैमध्ये ३,९९,३२४ दुचाकींची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. मात्र, त्यांचा बाजारातील हिस्सा थोडा कमी झाला आहे.

(हे ही वाचा: Tata Curvv EV देशात दाखल होताच टाटाचा आणखी मोठा धमाका! कंपनीने ‘ही’ घोषणा करताच ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद )

होंडाची उत्तम कामगिरी

होंडानेही चमकदार कामगिरी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने ३,६८,७५३ मोटारींची विक्री केली.

टीव्हीएस मोटर

TVS ने २,५१,१४० दुचाकी विकल्या, ज्यामुळे त्यांना यादीत तिसरे स्थान मिळाले. तर बजाज ऑटोने १,६१,४३५ मोटारींची विक्री केली.

इतर कंपन्यांची विक्री

याशिवाय सुझुकीने ७९,७९६ मोटारींची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. रॉयल एनफिल्डच्या विक्री अहवालानुसार, रॉयल एनफिल्डने ५७,३२५ दुचाकी विकल्या. Yamaha च्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर Yamaha ने ५४,६२२ दुचाकी विकल्या.

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात तेजी

ओला इलेक्ट्रिकने जुलैमध्ये ४१,६२४ दुचाकींची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. एथर एनर्जीच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, एथर एनर्जीने १०,०८७ दुचाकींची विक्री केली.
नवीन तंत्रज्ञान, आकर्षक डिझाईन्स आणि कमी किमती यामुळे ग्राहकांची आवड वाढत असल्याने दुचाकींच्या विक्रीत येत्या काही महिन्यांत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.