Hero Bike diwali offer: सणासुदीला अनेक लोक नवी-कोरी बाईक घ्यायच्या विचारात असतात. जर तुमचाही टू-व्हीलर घ्यायचा विचार सुरू असेल, तर ‘हीरो’ने तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे. ‘हीरो मोटोकॉर्प’ने दिवाळीपूर्वीच आपल्या बाईक आणि स्कूटरवर मोठ्या सवलतीच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज भासणार नाही.

‘हीरो’च्या अनेक मॉडेल्सवर ही सूट दिली जात आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होऊ शकतो. अशा ऑफर्सचा उद्देश सणासुदीच्या काळात विक्रीला चालना देणे हा आहे. जर तुम्ही हीरो बाईक घेण्याचा विचार करीत असाल, तर आजच या डिस्काउंट ऑफरबद्दल जाणून घ्या.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?

हेही वाचा… Diwali Sale: होंडा कंपनीकडून ‘या’ कार्सवर मिळणार तब्बल १ लाखापर्यंत डिस्काउंट, दिवाळी सेलची खास ऑफर जाणून घ्या

हीरो स्प्लेंडर प्लस (Hero SPLENDOR Plus)

हीरो स्प्लेंडर प्लसच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी दिली जात आहे. ईएमआयवर ही बाईक खरेदी केल्यास पाच हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. त्याशिवाय ५०० रुपयांचा हीरो गोल्ड लाईफ लाभ दिला जात आहे. तसेच तुम्ही ही बाईक १९९९ रुपयांची लोअर डाउन पेमेंट करून घरी घेऊन जाऊ शकता. तर ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला ५.९९ टक्के व्याजदर मिळतो जो निवडक बँकांमध्ये दिला जात आहे.

हीरो एक्स्ट्रिम 125R (Hero XTREME 125R)

हीरो एक्स्ट्रिम 125Rच्या खरेदीवर तुम्ही चांगली बचत करू शकता. दिवाळीपूर्वी या बाईकवर बचत करण्याची संधी दिली जात आहे. जर तुम्ही ही बाईक ईएमआयवर खरेदी केली, तर तुम्हाला पाच हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही ही बाईक १९९९ रुपयांच्या लोअर डाउन पेमेंटमध्येदेखील घरी घेऊन जाऊ शकता. इतकेच नाही, तर ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला ५.९९ टक्के व्याजदर मिळतो, जो निवडक बँकांमध्ये दिला जात आहे.

हेही वाचा… ‘या’ ७ सीटर कारसमोर महागड्या गाड्या पडतील फिक्या, १० लाखाच्या आत खरेदी करा फॅमिली कार, ‘हे’ ५ पर्याय ठरतील बेस्ट

हिरो डेस्टिनी 125 XTEC (Hero DESTINI 125 XTEC)

Hero DESTINI 125 XTEC या स्कूटरचाही या ऑफरमध्ये समावेश आहे. ग्राहकांना यावर ईएमआय ऑफर मिळत आहे, ज्यामध्ये त्यांना स्कूटर खरेदी केल्यावर पाच हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्याशिवाय १२,००० रुपयांचा विशेष लाभ दिला जात आहे. तुम्ही ही बाईक ८,९९९ रुपयांच्या लोअर डाउन पेमेंटमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. इतकेच नाही, तर ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला निवडक बँकांमध्ये शून्य टक्के व्याजदर मिळेल.

Story img Loader