तुम्ही नविन स्कूटर घेणार असाल आणि बाजारात असलेल्या स्कू़टरपैकी चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. १२५ सीसी स्कूटर सेगमेंटमधली दोन लोकप्रिय स्कूटरची डिटेल्स, मायलेज आणि किंमत जाणून घेऊयात. यासाठी आम्ही आज हिरो डेस्टिनी १२५ आणि सुझुकी एक्सेस १२५ स्कूटरबाबत माहिती देणार आहोत. माहिती मिळाल्यानंतर तुम्ही योग्य स्कूटर निवडू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hero Destini 125: हिरो डेस्टिनी 125 कंपनीची सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरपैकी एक आहे. ही स्कूटर कंपनीने बाजारात चार प्रकारांसह लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे तर, यात १२४.६ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ९.१ पीएस पॉवर आणि १०.४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. मायलेजबद्दल, हिरो दावा करतो की ही स्कूटर ४८ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. हिरो डेस्टिनी 125 ची सुरुवातीची किंमत ७०,४०० रुपये आहे. टॉप व्हेरियंटमध्ये जाताना ७५,९०० रुपयांपर्यंत जाते.

लोकसत्ता विश्लेषण: जुन्या गाड्यांची बाजारपेठ तेजीत; ऑनलाइन खरेदी विक्री करण्याऱ्या स्टार्टअप्सकडून मोठी मागणी, जाणून घ्या

Suzuki Access 125: सुझुकी अ‍ॅक्सेस ही हाय-टेक फिचर्ससह लांब मायलेज देणारी स्कूटर आहे. ही स्कूटर कंपनीने सहा प्रकारांसह लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.७ पीएस पॉवर आणि १० एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडले जाते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. स्कूटरच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की, स्कूटर ५७.२२ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. सुझुकी अॅक्सेस 125 ची सुरुवातीची किंमत ७४,४०० रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना ८३,६०० रुपयांपर्यंत जाते.