Hero Destini 125 XTEC स्कूटरमध्ये 124.6cc सिंगल सिलेंडर एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे जे 9bhp पॉवर आणि 10.4Nm पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच या स्कूटरमध्ये CVT देखील मिळेल.
Hero MotoCorp ने Hero Destini 125 XTEC स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 79,990 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. Hero MotoCorp च्या या स्कूटरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतील. याशिवाय Hero ने Destini 125 XTEC स्कूटरमध्ये अनेक कॉस्मेटिक अपडेट्स देखील केले आहेत. नेक्सस ब्लू शेड या गियरलेस स्कूटरमध्ये देखील उपलब्ध असेल.
Hero Destini 125 XTEC या रंगांमध्ये उपलब्ध – Hero MotoCorp ची Destini 125 XTEC स्कूटर मॅट ब्लॅक, पर्पल सिल्व्हर व्हाइट, नोबेल रेड, पँथर ब्लॅक, चेस्टनट ब्राउन आणि मॅट रे सिल्व्हर कलरमध्ये खरेदी केली जाऊ शकते.
Hero Destini 125 XTEC ची फिचर्स – Hero MotoCorp च्या या स्कूटरला रियर-व्ह्यू मिरर, मफलर प्रोजेक्टर, गोल हेडलॅम्प आणि हँडलबारवर क्रोम अॅक्सेंट देखील मिळतात. इतर काही अपडेट्समध्ये बॅकरेस्टसह नवीन सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑल-एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी समाविष्ट आहे.
आणखी वाचा : Suzuki Avenis स्टँडर्ड एडिशन लॉन्च, स्पोर्टी डिझाईनमध्ये मिळणार अनेक उत्तम फीचर्स
Hero Destini 125 XTEC चे इंजिन – Hero MotoCorp ने या स्कूटरमध्ये 124.6cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले आहे जे 9 bhp ची पॉवर आणि 10.4Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच या स्कूटरमध्ये CVT देखील मिळेल.
हीरो मोटोकॉर्पचे स्ट्रॅटेजी आणि ग्लोबल प्रॉडक्ट प्लॅनिंगचे प्रमुख मालो ले मैसन म्हणाले, “Destini XTEC मध्ये क्रोम स्ट्राइप, स्पीडोमीटर आर्टवर्क, एम्बॉस्ड बॅकरेस्ट आहे. यासोबतच यात नवीन एलईडी हेडलॅम्प आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी फिचर्स देखील आहेत. जर तुम्ही स्मार्ट स्कूटर माहिती शोधत असाल, तर Destini 125 XTEC एडिशन तुमच्यासाठी आहे.”