हीरो इलेक्ट्रिक कंपनीने सर्वच रेंजमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली आहेत. जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एचएक्स ही तुमच्यासाठी सर्वोत्तम स्कूटर असेल. पण जेव्हा तुम्हाला रोज जास्त अंतर जावे लागत नाही, तेव्हा हिरो इलेक्ट्रिकची फ्लॅश स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. कारण ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये ५० किमीची रेंज देते. यासोबतच ही इलेक्ट्रिक स्कूटर चालविण्यासाठी नोंदणी आणि वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक नाही. तसेच नवीन मोटार वाहन कायद्याप्रमाणे, ज्या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ४५ किमी प्रतितास पेक्षा कमी आहे ती चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी आवश्यक नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश किंमत

हीरो या इलेक्ट्रिक स्कूटरची दिल्लीच्या एक्स-शोरूम किंमत ४६,६६२ रुपये इतकी आहे. त्याच वेळी, ही स्कूटर २ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. जर तुम्हाला या स्कूटरला फायनान्स करायचे असेल तर ही सुविधा हिरो इलेक्ट्रिकच्या शोरूममध्येही उपलब्ध होऊ शकते.

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश डिझाइन

हीरो इलेक्ट्रिकने ही स्कूटर रेड आणि ग्रे कलरमध्ये लॉंच केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि अलॉय व्हील्स दिले आहेत. त्याच वेळी, या स्कूटरमध्ये पोर्टेबल बॅटरी आहे जी चार्ज करणे सोपे आहे. कंपनीने हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश स्कूटरमध्ये एलईडी हेडलॅम आणि यूएसबी चार्जरची सुविधाही दिली आहे.

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश स्कूटरची वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मॅग अलॉय व्हील, क्विक चार्ज क्षमता यांसारखे अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये दिले आहेत. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटरवर सामानाची बॅग ठेवण्यासाठी समोर चांगली जागा देण्यात आली आहे.

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश स्कूटर पॉवर

Hero Electric च्या फ्लॅश स्कूटरमध्ये कंपनीने २५०W ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. तसेच, कंपनीने या स्कूटरमध्ये पॉवरसाठी ४८Volt २०Ah बॅटरी पॅक दिला आहे. ज्याला पूर्ण चार्ज होण्यासाठी ७ ते ८ तास लागतात. त्याच वेळी, ही स्कूटर ताशी २५ किमी वेगाने धावू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero electric flash scooter gives a range of 50 km in a single charge does not require dl to run know features and price scsm