हिरो इलेक्ट्रिक कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Eddy लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. हिरो इलेक्ट्रिक Eddy चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही. Eddy इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नविन वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. हिरो इलेक्ट्रिकच्या Eddy स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ७२ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीने ही स्कूटर अतिशय साध्या बॉडीसह लाँच केली आहे. असं असलं तरीही Eddy इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला खूपच आकर्षक दिसते. हिरोने Eddy इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतरासाठी डिझाइन केली आहे. तरीही कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. Eddy मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरप्रमाणेच तुम्हाला फिड माय बाईक, ई-लॉक, मोअर बूट स्पेस, फॉलो मी हेडलॅम्प आणि रिव्हर्स मोड यांसारखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये मिळतील.

हिरो इलेक्ट्रिकने Eddy स्कूटर दोन रंगांमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे ग्राहकांना ही इलेक्ट्रिक स्कूटर पिवळ्या आणि लाईट शेडमध्ये मिळणार आहे. हीरो Eddy स्कूटरसाठी नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार

हिरो इलेक्ट्रिकचे एमडी नवीन मुंजाल यांनी सांगितले की, हिरो इलेक्ट्रिक Eddy स्कूटरच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त वाहतुकीला प्रोत्साहन देईल. हिरो इलेक्ट्रिक Eddy स्कूटर कार्बनमुक्त आणि आरामदायी प्रवास करता येईल, अशा प्रकारे डिझाइन केली आहे.